- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live:सुरजागड खाण विस्तार विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Maharashtra Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. बातम्यांचे वेगवान अपडेटस् आणि ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामकृष्ण बीच येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा (International Yoga Day) भव्य समारोह आयोजित केला जातो आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू हजर...More
, खासदारांनी नियोजन समितीच्या बैठकीत केला खुलासा, पालकमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश
--------------------
Anchor - नांदेड शहरातील काही मेडिकलवर विद्यार्थी आणि युवकांना नशेच्या गोळ्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर त्यांनी ही बाब उजेडात आणली. नांदेड शहरात कोचिंगसाठी जवळपास वीस पंचवीस हजार विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना काहीजण व्यसनाधीन करताहेत. काही औषधी ज्यामुळे नशा येतो त्या युवकांना दिल्या जात आहेत.खासदार रवींद्र चव्हाण यांच्या या खुलाश्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी अश्या मेडिकलवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले. प्रेगा 300, नायट्रोसन यासारख्या गोळ्यापासून युवक नशा करताहेत. कफसिरप चा वापरहीनशेसाठी केल्या जात असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सांगितले. डॉक्टरांच्या चिठठीशिवाय अश्या औषधी देणाऱ्या मेडिकलवर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
खेड शहरात सलग दुसऱ्या दिवशी 10 फूट लांबीची मगर मानवी वस्तीत आढळून आली. सहजीवन हायस्कूल शेजारील भागात ही मगर पुराच्या पाण्यातून आली होती. वनविभाग आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तत्काळ मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. पुरामुळे शहरात मगरी दिसण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रायगड : कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका सेलेरिओ कारने वृद्ध दाम्पत्याच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे बेदरकार चालक संस्कार मुकेश अंजने (24, रा. मध्यप्रदेश) याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
Beed News: बीडचा माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडलेय. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
यातील पहिला हप्ता तातडीने आणि उर्वरित रक्कम प्रस्ताव मंजूर झाल्यावर घेण्याचे त्यांनी मान्य केले. तक्रारीप्रमाणे लाचेची मागणी झाल्याचे झाल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने माजलगाव येथील गजानन मंदिर रोडवर असलेल्या सरपंचाच्या घरी सापळा रचत खेत्रे याला पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारताना रंगे हात पकडले.दरम्यान झडतीत ५३ हजार ४५० रुपये रोख रक्कम व मोबाईल आढळून आले असून त्याच्या विरोधात माजलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाच्या वेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते. मात्र सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला. त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची पोट मोठी दुखी आहे. असा मोठा दावा करत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर असल्या पूजा करून कोण निवडून येत असतं तर आम्हाला काय कवट्या मिळत नाहीत का? सुया मिळत नाहीत का? हे सगळं थोतांड आहे. असे सांगत मंत्री भरत गोगावलेंची (Bharat Gogawale) पाठराखण ही त्यांनी केलीय.
गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड लोहखनिज खाणींच्या क्षमता विस्ताराच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. क्षमता विस्ताराची परवानगी देताना सर्व प्रक्रिया नियमानुसार झालेली आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक अटी आणि शर्तींचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्या जनहित याचिका खारिज केल्या. रायपूर येथील खनिकर्म कंत्राटदार समरजीत चॅटर्जी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांमध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने लॉयड्स मेटल्सच्या सुरजागडस्थित लोहखाणीची क्षमता वार्षिक 3 दशलक्ष मेट्रिक टनावरून वार्षिक 10 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठी आणि 10 दशलक्ष मेट्रिक टनावरून 26 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यासाठी दिलेली पर्यावरणीय मंजुरी आणि विहित अटी व शर्तींची संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर होती, असा आरोप केला होता. मात्र न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने संपूर्ण प्रक्रियेचे पालन झाले असे निरीक्षण नोंदवून दोन्ही जनहित याचिका योग्यताविहीन असल्याचे निरीक्षण नोंदवत फेटाळल्या. या 35 पानांच्या या निकालपत्रात न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणातील बाबी स्पष्टपणे नमुद केल्या आहेत
सायन - पनवेल हायवेवर मर्सिडीज गाडीची धडक बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. १९ वर्षीय तरूणी गाडी चालवत होती. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तीर्था सिंग या इंजिनिअरिंग करणाऱ्या तरूणीला ताब्यात घेण्यात आले आहे. गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे जात असताना हा अपघात घडला आहे. बेलापूर वरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिला रेखा यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारे तिचे पती गोपाल यादव गंभीर जखमी झाले आहेत.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील तेलीखुंट परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन मटका बुकींवर छापा टाकून ३५ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत १० लाख ४६ हजार ३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेरातील मटका अड्ड्यांवरील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकच्या या कारवाईमुळे संगमनेर शहरातील जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने संगमनेर शहरातील तेलीखुंट परिसरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन मटका बुकींवर छापा टाकून ३५ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत १० लाख ४६ हजार ३१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेरातील मटका अड्ड्यांवरील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकच्या या कारवाईमुळे संगमनेर शहरातील जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जणं करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतात. मात्र मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात.
अब्दुल रजा आहे मूळ हैदराबादला राहायला गेलेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. आणि अनेक वारकरी त्यांचे सेवा घेण्यासाठी न चुकता येत असतात.
या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो., आणि माझा मालिश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचे ब्रॅण्डिंग हे होत असते. म्हणून ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो.
मनात कुठलाही समतोल न ठेवता सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले वीस वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करतात.
Beed News : दोन दिवस गेवराई तालुक्यातील मुक्कामानंतर आज मुक्ताईंची पालखी बीडच्या नामलगाव येथे दाखल होत आहे. पाडळशिंगी येथे मुक्काम केल्यानंतर वारकरी बीडच्या दिशेने निघाले आहेत. पाडळशिंगी, हिरापूर आणि नामलगाव असा प्रवास आज पालखीचा असणार आहे. नामलगाव येथील मुक्कामानंतर उद्या बीड शहरात मुक्ताईंच्या पालखीचे आगमन होईल.
मुक्ताईनगरमधून निघालेली ही पालखी सात जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करते. संत ज्ञानेश्वर, निवृत्ती आणि सोपानदेव यांची मुक्ताबाई ही बहिण. हजारो वारक-यांसोबत ही बहिण वाखरी येथे आपल्या भावाला म्हणजेच ज्ञानेश्वारांना भेटते आणि हा वैष्णवाचा मेळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रस्थान करतो.
- नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
-
- दुपारी बारा वाजेपासून विसर्ग वाढबिण्यात आलाय
-
- 1160 क्युसेक वेगावरून 2 हजार 320 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय
-
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असणारा पाऊस ढगाळ हवामान यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचा विसर्ग वाढबिण्यात आला आहे
- सध्या गंगापूर 65 ते 66 टक्के पाणीसाठा असून जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा 42 टक्यावर गेला आहे
जिल्ह्यातील एकूण 5 धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय
नदी काठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
बीडच्या आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र गहीनाथ गडाचा पालखी सोहळा 25 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मात्र या पालखी सोहळ्याच्या दिंडी मार्गाचा मार्ग खडतर आहे.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराजांची पालखी 25 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. वनवेवाडी घाटातून हा पालखी मार्ग जातो. परंतु या पालखी मार्गाची मोठी दुरावस्था आहे. पावसामुळे डोंगरातील दरड कोसळली असून झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने मार्ग खडतर बनलाय..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पालखी सोहळ्याचा मार्ग सुखकर केला जाईल. असा शब्द दिला होता.. त्यामुळे पालखी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फडणवीस यांनी पालखी मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा असं साकडं वारकऱ्यांनी घातले आहे..
संत श्रेष्ठ गजानन गजानन महाराजांच्या पालखीने आज परळीतून अंबाजोगाई कडे प्रस्थान केलेय.दरम्यान ही पालखी अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून पालखी मार्गक्रमण करते.यंदा पाऊस झाल्याने या घाटात जणू निसर्गाने हिरवी चादर पांघरल्याचा आभास होत आहे.याच घाटातून हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत आहेत.
मुंबई मधील सर्वात सुरक्षित आणि अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या आयआयटी कॅम्पस मध्ये एक बाहेरील व्यक्ती तब्बल आठ ते दहा दिवस घुसून राहिल्याच्या प्रकार समोर आला आहे. बिलाल अहमद फय्याज अहमद तेली (२२) हा मूळचा कर्नाटक चा रहिवासी आहे. याला पोलिसांनी अटक केली आहे. पवई आयआयटी मध्ये तो एकदिवसीय कोर्स साठी आला होता, मात्र त्याने कैम्पस सोडलेले नाही आणि तो आत मध्ये सुमारे आठ ते दहा दिवस राहिला. एका कर्मचाऱ्याने त्याच्याकडे आयडी ची विचारणा केली असता तो पळून गेल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र आयआयटी सारख्या अतिसंवेदनशील विभागात अश्या प्रकारे सुरक्षेची चूक झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीत ईडीची धाड
बड्या चांदी व्यवसायिकाच्या कार्यालयात तब्बल 15 तास चौकशी
हुपरीत ईडीची धाड पहिल्यांदाच पडल्याने शहरात जोरदार चर्चा
चौकशी दरम्यान कुणालाही महावीर नगर परिसरात फिरकू दिले नाही
निधी बँकशी संबंधित असलेल्या व्यक्तीची केली चौकशी
चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं याबाबत कोणती माहिती नाही
Accident News: भंडारा बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरून जाणाऱ्या दुचाकीवरील एका कुटुंबातील चौघांना पाठीमागून भरधाव आलेल्या होंडा सिटी कार नं जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना बायपास महामार्गावरील कोरंबी देवस्थानजवळ घडली. अपघातग्रस्त कुटुंब हे लाखनी येथून भंडाऱ्याच्या परसोडी या गावाकडं जात असताना हा अपघात घडला. सर्व जखमींवर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. देविदास नांन्हे (३७), कविता नान्हे (३२), चेतना नान्हे (८), दिव्यांश नान्हे (५) असं अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत.
मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक..
मनसेतील कार्यप्रणाली आणि कामकाजाबाबत घेतला जाणार आढावा
२४ जून पर्यंत मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठका नियोजित
बैठकीत विभागनिहाय कामकाजावर होणार चर्चा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील A+ सीट बाबत वर्गवारी करणार असल्याची माहिती
Bhiwandi: भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोरसई गावात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये सागर परशुराम धुमाळ (वय 30, विवाहित) आणि अक्षय परशुराम धुमाळ (वय 25) या सख्या भावांचा समावेश आहे. दोघेही नदीत पोहण्यासाठी गेले असताना खोल पाण्यात बुडाले. लहान भाऊ पाण्यात बुडत असताना मोठा भाऊ वाचवण्यासाठी गेला व दोघेही नदीपात्रात वाहून गेले होते. आज सकाळपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) कडून शोधमोहीम राबवण्यात आली.
एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी दाखल झाली असून दोन बोटींच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन करण्यात आले. अखेर दोघांचेही मृतदेह शोधण्यात एनडीआरएफला यश आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनास्थळी आणि रुग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली होती. कुटुंबीयांच्या रडण्याने वातावरण हृदयद्रावक झाले होते. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घरातील कमवता पुरुष गेल्याने धुमाळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोकणातील आणखी एका प्रसिद्ध देवस्थानाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केली आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये दर्शनासाठी वेळ देखील निश्चित केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मार्लेश्वर देवस्थाननं ड्रेस कोड संदर्भातला निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना दर्शन घेत असताना अंगभर वस्त्र परिधान करावे लागणार आहे.भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वरचे दर्शन घ्यावे. पेहराव हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा असं आवाहन मार्लेश्वर देवस्थानकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे पावसाळ्यामध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुले राहणार आहे. वार्षिक धार्मिक विधी आणि श्रावणी सोमवार निमित्त योग्य निर्णय घेऊन मंदिर अधिक वेळ खुलं राहणार असं मंदिर देवस्थान समितीने म्हटलं आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक देखील काढलं आहे.
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्या क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृतदेह अपघाताच्या नऊ दिवसानंतर मुंबईत, आज होणार बदलापूर मध्ये अंत्यसंस्कार
12 तारखेला अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात या विमानातील क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झाला...
त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मागील नऊ दिवस दीपक यांचा मृतदेह मिळेल याची वाट बघितली... डीएनए टेस्ट होऊन सुद्धा डीएनए मॅच नसल्याने कुटुंबीयांना नऊ दिवस वाट पाहावी लागली... त्यानंतर काल डी एन ए मॅच झाल्यानंतर दीपक पाठक यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आला
आज दीपक पाठक यांच्यावर बदलापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत
Raigad Rain: रायगड मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हयातील लघुपाटबंधारे विभागातील एकूण 28 धरणांपैकी 15 धरण 100 टक्के भरली आहेत. मुसळधार पावसाच्या धुंवाधार बॅटिंगमुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.तर उर्वरित 13 धरण प्रकल्पात 70 टक्क्यांहून अधिक टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याची माहिती रायगड लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील धबधबे देखील प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पाऊले आता हळहळू या धबधब्यावर येऊ लागली आहेत.
उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पंधरा हजार क्युसेक करण्यात आला असून वीज निर्मितीसह सध्या भीमा नदीत धरणातून 16000 क्युसेक वीसर्गाने पाणी सोडले जात आहे ..उजनी धरणात सध्या जवळपास 103 टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला असून धरण 73 टक्के एवढे भरले आहे .. उजनी धरणाकडे येणारा पाण्याचा विसर्ग आता थोडा कमी झाला असून धरणात सध्या 42 हजार 637 क्युसेक एवढ्या विसर्गाने पाणी येत आहे .. प्रशासनाने नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू...
तालुक्यातील गोरसई येथील घटना...
सागर परशुराम धुमाळ,30 विवाहित ,अक्षय परशुराम धुमाळ,25 अशी बुळालेल्यांची नावे आहेत
काल सायंकाळच्या सुमारास घडलेली घटना आज सकाळपासून NDRF कडून शोध मोहीम सुरू
एकाचा मृतदेह सापडला असुन दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचा काम सुरू आहे
घटनास्थळी एनडीआरएफ ची एक टीम दाखल असून 2 बोट च्या मदतीने सर्च
शेत जमिनीच्या कारणास्तव होणारे वाद रोखण्यासाठी बीड पोलिसांनी "पोलीस आपले बांधावर" संकल्पना सुरू केलीय. मागील काही दिवसांमध्ये शेतीच्या बांधावरून आणि वादातून मोठे वाद उफाळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आणि यालाच रोख लावण्याकरिता पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस आपले बांधावर ही संकल्पना राबवली आहे.
खरीप/रब्बी पूर्व हंगाम शेती मशागतीचे कामे सुरू असताना शेतातील बांधावरून अनेकदा वाद समोर येतात. याचे रूपांतर हाणामारी होते. आणि यातून गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतात. पोलिसांकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खात्री करून योग्य त्या कारवाया करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी तपासणी केली असून त्यात राज्यातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळल आहे.यामुळे या महाविद्यालयांना करणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये राज्यात नव्याने मान्यता मिळालेल्या १० महाविद्यालयांसह मुंबई महानगरपालिका आणि पुण्यातील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. याबाबत महाविद्यालयांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एनएमसीने थेट वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआरच्या संचालकांना ही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात सायंकाळच्या सुमारास शेतात काम करून घरी परतत असलेल्या महिलेसमोर तिच्या चार वर्षाच्या मुलीला बिबट्याने झडप घालून ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..जानवी सुरेश मेंगाळ ( वय - ४ )असे या चिमुरडीचे नाव आहे. दरम्यान आईचा आक्रोश ऐकून आजूबाजूच्या मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पसार झाला.या घटनेची माहिती वन विभागाला कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला..या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि कुलाचार कुलधर्म करण्यासाठी महाराष्ट्र सह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणातून भाविक येतात. भाविकांना तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा करण्यासाठी जुलै महिन्याची ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू होत आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे. सिंहासन पूजा नोंदणी 21 जून रोजी सकाळी दहा वाजता पासून सुरू करण्यात येत असून ती 26 जून 2025 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करता येईल. तर जुलै महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकिंग झाल्याची यादी 30 जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत पाहायला मिळालं. मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जनाचे धडे घेत असल्याचे वास्तव आहे..
बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2474 शाळा असून यात 2415 शाळा प्राथमिक तर 49 शाळा माध्यमिक आहेत. 11 तालुक्यातील 349 शाळांच्या 592 वर्ग खोल्या धोकादायक असून याच धोकादायक वर्ग खोल्यात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही ठिकाणी वर्ग खोल्या धोकादायक असल्याने खबरदारी म्हणून झाडांखाली शाळा भरविल्या जात आहेत.
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गवर जुनापाणी गावालगत अज्ञात वाहनाचे धडकेत अस्वल ठार. अस्वल महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अस्वलीचा जागीच मृत्यू झाला. हे अस्वल बोर अभयारण्यातून खापरी बारोकर जंगल क्षेत्रातून अहमदनगर उपवनात भागात जात असताना महामार्ग ओलांडताना ही घटना घडली आहे.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 9.67 टीएमसी म्हणजे 33..19 टक्के पाणीसाठा जमा..
गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.58 टीएमसी म्हणजे 12.27 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता.
म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध..
चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.सध्या पाणी साठा चांगला वाढला आहे.
खडकवासला 1.27 टीएमसी
पानशेत 2.99 टीएमसी
वरसगाव 4.83 टीएमसी
टेमघर 0.59 टीएमसी
सामनातून नेमकी काय टीका?
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्या यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व. त्याच मिंधे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस गाडण्याची भाषा पुन्हा केली आहे. ज्यांचे मीठ खाऊन या पदास ते पोहोचले त्यांनाच गाडण्याची भाषा हे करतात. अधःपतनाची सगळ्यात खालची पातळी गाठल्याचे हे उदाहरण आहे. मिंधे यांचे स्वतःचे असे काहीच नाही. पक्ष चोरलेला, बाप चोरलेला, अमित शहांचे नेतृत्वदेखील भाड्याचे, राजकारणात आणलेला पैसाही चोरीचा. विचार असा नाहीच.
फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ते दिल्लीत जातात. अमित शहांचे जोडे कवटाळून परत येतात. असे हे लोक स्वाभिमानाच्या, मराठी स्वाभिमानाच्या इरसाल बाता करतात तेव्हा गंमत वाटते.
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकर योगासने करणार आहेत. हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेसात वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे कार्यक्रम होणार. याचवेळी शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत.
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी - काटोल रोड वर ट्रक व दुचाकीत भीषण अपघात..
अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर तर दोन गंभीर..
कोंढाळी चक्रीघाट मध्ये अनियंत्रित ट्र्क ने एकामागे एक असलेल्या दोन दुचाकींना एकाचवेळी धडक दिली ..
यात मंगेश खाडे व पवन सेमबेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर आकाश जवणे व गौतम बगाडे हे गंभीर जखमी झाले ..
अपघात नंतर 108 क्रमांकाची अम्बुलंस पोहचायला एक तास लागल्याने जखमींना वेळेत उपचार मिळायला बघाच वेळ लागला ..
जखमींना नागपूरच्या शासकीय रुग्णालय उपचारासाठी भरती करण्यात आले.
Sindhudurg Accident News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील नारिंग्रे गावात रिक्षा आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू (Accident News) झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
विरार : पश्चिम रेलवे चे पालघर रेल्वे स्थानकवर ओवर हेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी सर्व गाड्या ठप्प झाल्या आहेत
ओवर हेड वायर तुटल्याने विरार ते डहाणूच्या रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. विरार रेल्वे स्थानकात घरी जाणाऱ्या चाकरमण्याची गर्दी वाढत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहे. विरारच्या म्हारंबळपाडा येथून सुवर्णंदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि ने शेवटची फेरी बोट ही 10:10 ची वाढवून, 12:00 वाजेपर्यंत केली आहे. तर एस टी महामंडळाच्या बसेस ही पालघर सफाळे डहाणू पर्यंत अधिक बसेस सोडण्यात येत आहेत. मात्र काही प्रवाशांना रेल्वे सेवा सुरु होईपर्यंत रात्र स्टेशनवर काढावी लागणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामकृष्ण बीच येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भव्य समारोह आयोजित केला जातो आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू हजर आहेतझ यामध्ये सुमारे 5 लाख लोकांनी सहभाग नोंदवला असण्याची शक्यता आहे. .
आयुष मंत्रालय आणि आंध्रप्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. 40 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होण्याची शक्यता आहे…
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live:सुरजागड खाण विस्तार विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली