Air India Plane Crash Black Box: केंद्र सरकारने अत्याधुनिक सुविधा सुरु केली पण Black Box चा डेटा रिकव्हर होईना; आता 'या' देशात तपासणीसाठी पाठवणार

Air India Plane Crash Black Box : विमानाला लागलेल्या आगीत ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की, त्यातील डेटा रिकव्हर करणे अत्यंत कठीण झाले आहे.

Continues below advertisement

Air India Plane Crash Black Box : अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघातानंतर विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला असला, तरी अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या अपघातात 'ब्लॅक बॉक्स'ला काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Continues below advertisement

अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार आहे. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता. मात्र, विमानात लागलेल्या आगीत ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की, त्यातील डेटा रिकव्हर करणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे तो अधिक तांत्रिक तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) हे ब्लॅक बॉक्सचे दोन भाग उष्णता आणि आगीमुळे खराब झाले आहेत. सध्या देशात अशी कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नाही, जिथे या नुकसानग्रस्त उपकरणांमधून डेटा रिकव्हर करता येऊ शकेल. त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नेमका कसा झाला होता अपघात? 

12 जून रोजी एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच भीषण अपघात झाला. हे विमान दुपारी 1:40 वाजता मेघाणी नगर भागातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. यामुळे मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. या दुर्घटनेत विमानातील 242 प्रवाशांपैकी फक्त एकजण बचावला. तसेच, विमान कोसलेल्या परिसरातील 33 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातून वाचलेला एकमेव प्रवासी ब्रिटिश-हिंदुस्थानी नागरिक असून तो 11 A या सीटवर बसलेला होता.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाची उपकरणं वापरली जातात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR). यांनाच एकत्रितपणे ‘ब्लॅक बॉक्स’ असे म्हटले जाते. यातील एका उपकरणात कॉकपिटमध्ये झालेलं संभाषण रेकॉर्ड केलं जातं, तर दुसऱ्यामध्ये विमानाच्या कार्यप्रणालीसंदर्भातील माहिती जसे की वेग, उंची आणि इतर तांत्रिक आकडेवारी नोंदवली जाते. 

आणखी वाचा

Air India Plane Crash : 'आम्ही अगोदरचं इशारा दिलेला' ड्रीमलाइनर दुर्घटनेबाबत दोन केबिन क्रू मेंबर्सचा मोठा दावा,पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola