Pakistan Murree Snowfall : उत्तर पाकिस्तानमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहनांमध्ये अडकून सुमारे 23 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब प्रांतातील रावळपिंडीमधील मुरी शहरात मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले होते आणि त्याच दरम्यान तेथे जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्याने तेथे वाहनांसह पर्यटक अडकली आणि प्रशासन हतबल झाले.
पाकिस्तानातील प्रसिद्ध हिल पर्यटन स्थळ मुरी येथे झालेल्या हिमवृष्टीमुळे 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर पाकिस्तानचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या घटनेबाबत अत्यंत लज्जास्पद वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी 'समा'शी बोलताना फवाद चौधरी म्हणाले की, ''सरकार आणि प्रशासन अडकलेल्या लोकांसाठी काहीही करू शकत नाही, लोकांनीही आपली अक्कल वापरावी.''
पाकिस्तानी मंत्र्याचे वादग्रस्त विधान
पाकिस्तान सरकारची लाचारी एवढी आहे की, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करण्याऐवजी त्यांनी मृतांची खिल्ली उडवणारे लज्जास्पद विधान केले. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, ''जर तुम्हाला जिवंत रहायचे असेल तर घरीच राहा, इतका खर्च करण्यापेक्षा तुम्हाला बर्फाचा आनंद घ्यायचा असेल, तर लोक घरी स्नो स्प्रे खरेदी करा आणि एकमेकांवर फवारा. यासाठी प्रशासन नाही, तुमची अक्कलही वापरली पाहिजे.''
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने राजधानी इस्लामाबादपासून 64 किमी ईशान्येस असलेल्या मुरीला आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कारण तेथे अजूनही अनेक वाहने अडकून पडली आहेत. मुरी येथे बळी गेलेल्या 23 पर्यटकांमध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. या मुलीला बर्फवृष्टीमुळे सर्दी आणि न्यूमोनिया झाला आणि वाहने अडकल्यामुळे तिला वेळेवर रुग्णालयात नेता आले नसल्याने तिचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या :
- Deltacron : धोका वाढला! 'या' देशात सापडला कोरोनाचा नवा 'डेल्टाक्रॉन व्हेरियंट'
- PM Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षाभंग प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन, NIA-IB अधिकाऱ्यांचाही समावेश
- Sulli Deals : 'बुली बाई'नंतर 'सुली डिल्स' अॅप चर्चेत, जिथे रचला गेला मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याचा पहिला कट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha