New Deltacron Variant : एकीकडे कोरोनाचा ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटमुळे जगभरात दहशतीचे वातावरण आहे. त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट (New Corona Variant)  आढळून आला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रस (Cyprus) देशामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांचा मिश्र प्रकार आढळून आला आहे. शास्त्रज्ञांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि डेल्टा पासून तयार झालेला कोरोनाचा नवीन प्रकार शोधला आहे. सायप्रसच्या एका संशोधकाने कोविड-19, 'डेल्टाक्रॉन' या कोरोनाच्या नवीन प्रकाराचा शोध लावला आहे, जो ओमायक्रॉन व्हेरियंट आणि डेल्टा व्हेरियंटचे संमिश्र स्वरुप असल्याचा दावा केला जात आहे.

Continues below advertisement

सायप्रस देशात आढळला 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटसायप्रस विद्यापीठातील (Cyprus University) जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख लिओनडिओस कोस्ट्रिकिस (Leondios Kostrikis)  यांच्या मते, डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचे संमिश्रण असलेला एक नवा व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' सायप्रसमध्ये आढळून आला आहे. प्रोफेसर लिओनडिओस कोस्ट्रिकिस म्हणाले की, सध्या ओमाक्रॉन आणि डेल्टा हे दोन वेगवेगळे व्हेरियंट आहेत. मात्र, दोन्ही प्रकारांच्या मिश्रणातून एक नवीन स्ट्रेन तयार करण्यात झाला आहे. यामध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या जीनोममधील रचना आढळून आल्यामुळे नव्या प्रकाराला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.

Continues below advertisement

 

नव्या 'डेल्टाक्रोन' व्हेरियंटच्या 25 रुग्णांची नोंदसायप्रस विद्यापीठातील बायोलॉजिकल सायन्सेसचे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस आणि त्यांच्या टीमने अशी 25 प्रकरणे ओळखली आहेत. सांख्यिकीय विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांमध्ये रूग्णालयात दाखल नसलेल्या रूग्णांपेक्षा या व्हेरियंटचा संसर्ग जास्त आहे. संशोधकांनी 25 डेल्टाक्रोन प्रकरणांचे परिणाम आंतरराष्ट्रीय डेटाबेस GISAID ला पाठवण्यात आले आहेत, जे नव्या व्हेरियंटमधील बदलांचा शोध घेतली. सध्या, नवीन डेल्टाक्रॉन व्हेरियंट किती संसर्गजन्य आणि प्राणघातक आहे याबद्दल फारशी माहिती नाही.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majhahttps://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA