एक्स्प्लोर

हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी, पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य

दहशतवाद्यांचा कारखाना बनलेल्या पाकिस्तानने अखेर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी असल्याचं मान्य केलं आहे.

न्यूयॉर्क : दहशतवाद्यांचा कारखाना बनलेल्या पाकिस्तानने अखेर लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड हाफिज सईद पाकिस्तानसाठी डोकेदुखी असल्याचं मान्य केलं आहे. तसेच सईदसारख्या दहशतवाद्यांसाठी आम्हाला दोषी धरु नका, असं विनवणी पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे. आसिफ मंगळवारी अशिया सोसायटी फोरमला संबोधित करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, "इस्लामाबादची सर्व सूत्रं हक्कानी नेटवर्क, हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबाच्या हाती आहेत, हे म्हणणं सहज सोपं आहे. पण हे लोक आमच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांच्यापासून पिछा सोडवण्यासाठी पाकिस्तानाला थोडा वेळ जाईल, कारण, सध्या या डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी पाकिस्तानकडे पुरसा पैसादेखील नाही." ते पुढं म्हणाले की, "अम्हाला हक्कानी नेटवर्क आणि हाफिज साईदसाठी दोष देऊ नका. कारण, 20 ते 30 वर्षांपूर्वी हे तुम्हाला (अमेरिकेला) प्रिय होते. या लोकांचं व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत होत होतं. आणि आता तुम्ही म्हणता, पाकिस्ताननं नर्कात जावं, कारण, या लोकांना पाकिस्ताननं पोसलं आहे." यावेळी अफगाणिस्तान प्रश्नावरुनही आसिफ यांनी अमेरिकेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. "अफगाणिस्तानात शांतता प्रस्तापित व्हावी, अशी पाकिस्तानची पण इच्छा आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानलाही काही मर्यादा येत आहेत. एकटा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या शांततेची जबाबदारी घेऊ शकत नाही. यासाठी जगातल्या ज्या काही बलाढ्य महाशक्ती आहेत, त्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत." असं त्यांनी यावेळी सांगितलं. हाफिज सईद 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्लात एकूण 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भारताकडून सातत्यानं मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget