(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan: पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचला; पक्षाच्या नेत्याचा दावा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आला असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा पीटीआय पक्षाचे ज्येष्ठ नेते फैजर वावडा यांनी केला आहे.
लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप पाकिस्तान तेहरिक ए इस्लाम या पक्षाचे वरिष्ठ नेते फैजल वावडा यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या जीवाला धोका असून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना खबरदारी घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. पंतप्रधान इम्रान खान हे आज संध्याकाळी पाकिस्तानला संबोधित करणार होते, पण त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार कधीही पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला अस्थिर करण्याचा परकीय देशांचा डाव असल्याचा आरोप इम्रान खान यांनी करत सर्व पत्रकारांना तशी एक चिठ्ठी लिहिली आहे. इम्रान खान यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव जर संसदेत मंजूर करण्यात आला तर पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये वाढ होईल असं इम्रान खान यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) senior leader Faisal Vawda has claimed that Prime Minister Imran Khan’s life is in danger as a plot has been hatched to assassinate him: Pakistan's ARY News
— ANI (@ANI) March 30, 2022
(File photo) pic.twitter.com/cKlzyfX2mL
पाकिस्तानमधील राजकीय गणित
पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण 342 सदस्य आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. एमक्यूएम या पक्षाने इम्रान खान यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडे आता 177 सदस्य संख्या झाली असून इम्रान खान यांनी बहुमत गमावल्याची स्थिती आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला असून विरोधी पक्षांकडे त्यासाठीचा 172 हा बहुमताचा आकडा आहे.
संबंधित बातम्या :
- Political Crisis In Pakistan: इम्रान खान देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? मंत्र्यांनी केला हा दावा
- Pakistan Political Crisis: पाच वर्षे पूर्ण करेन, राजीनामा देणार नाही; इम्रान खान यांनी व्यक्त केला विश्वास
- PM Imran Khan : पंतप्रधानपद वाचवण्याचा इम्रान खान यांचा अखेरचा प्रयत्न! एका मुख्यमंत्र्यांचा त्याग, दुसऱ्या पक्षाला ऑफर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha