Bomb Blast In Pakistan : पाकिस्तानातील कराची (Blast In Karachi) येथे काल रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे, या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला, तसेच यामुळे आजूबाजूला उभी असलेली वाहने देखील उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. कराचीमध्ये हा स्फोट झाला असून यावेळी बाजारपेठेत प्रचंड गोंधळ उडाला होता.


तिघांचा मृत्यू झाला, जखमींची संख्या तेराहून अधिक


प्राथमिक माहितीनुसार, या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या तेराहून अधिक आहे. बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. कचराकुंडीच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


बॉम्बमध्ये 2 किलो स्फोटकांचा वापर 


या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट टायमरने करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळावरून लोकांना हटवण्यात आले आहे. शहराचे केंद्र जेथे स्फोट झाला. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. या भागाला डाउनटाउन म्हणतात. त्याचबरोबर स्फोटामुळे आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी जबाबदारी स्वीकारली


त्याच वेळी, सिंध आणि बलुचिस्तानच्या फुटीरतावादी गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या


Congress News : काँग्रेसचं आजपासून चिंतन शिबिर, महत्वाच्या सहा प्रस्तावावर होणार चर्चा, महाराष्ट्रातील 'हे' नेते राहणार उपस्थित


डी-गँगशी संबंध असलेल्या दोघांना अटक, छोटा शकीलच्या सोबतीने गैरव्यवहार, NIA ची कारवाई 


PM Modi : भारताची कोविड-19 लसींचे 5 अब्ज डोस तयार करण्याची क्षमता, WHO मान्यताप्राप्त 4 लसींची निर्मिती : पंतप्रधान मोदी


Diksha Dagar : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी दिक्षा डागर आहे तरी कोण?