PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, कोविड-19 लसींचे पाच अब्ज डोस तयार करण्याची भारताची क्षमता आहे आणि या वर्षी चार WHO-मान्यताप्राप्त लसी देशात तयार केल्या जात आहेत. ते दुसऱ्या ग्लोबल व्हर्च्युअल कोविड समिटमध्ये बोलत होते.


WHO ने मंजूर केलेल्या चार लसींची निर्मिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुसऱ्या ग्लोबल कोविड व्हर्च्युअल समिटला संबोधित केले. यादरम्यान मोदी म्हणाले की, भारत WHO ने मंजूर केलेल्या चार लसींची निर्मिती करत आहे, यावर्षी आमच्याकडे 5 अब्ज डोस तयार करण्याची क्षमता आहे. कोरोना महामारी अजूनही जनजीवन विस्कळीत करत आहे, पुरवठा साखळी विस्कळीत करत आहे. भारतात, आम्ही साथीच्या रोगाविरूद्ध लोककेंद्रित धोरण स्वीकारले आहे. आम्ही आमच्या अर्थसंकल्पात आतापर्यंत आरोग्यावर सर्वाधिक तरतूद केली आहे.


इतर देशांना मदत


पीएम मोदी म्हणाले की, भारताचा लसीकरण कार्यक्रम जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. आम्ही जवळपास 90% प्रौढ लोकांचे आणि 50 दशलक्षाहून अधिक मुलांचे पूर्णपणे लसीकरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोविडशी सामना करण्यासाठी भारताने चाचणी, उपचार आणि डेटा व्यवस्थापनासाठी कमी किमतीचे तंत्र विकसित केले आहे. आम्ही या क्षमता इतर देशांना देऊ केल्या आहेत. जीनोमिक्स कन्सोर्टियम ऑफ इंडियाने व्हायरसवरील जागतिक डेटाबेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


ग्लोबल सप्लाय चैनची गरज


पीएम मोदी म्हणाले की, हे स्पष्ट आहे की भविष्यातील आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी समन्वित जागतिक प्रतिसादाची गरज आहे. आपण एक लवचिक ग्लोबल सप्लाय चैन तयार केली पाहिजे, तसेच लसी आणि औषधांपर्यंत समान प्रवेश दिला पाहिजे.


महत्वाच्या बातम्या :