Milky Way's Black Hole: आजचा दिवस खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचा आकाशगंगेतील सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे चित्र टिपण्यात नासाच्या शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या ब्लॅकहोलचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर कोणत्याही वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता या ब्लॅक होलमध्ये आहे. इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप (EHT) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीनं हे चित्र प्रदर्शित करण्यात आलं आहे. याच आतंरराष्ट्रीय संस्थेकडून 2019 साली पहिल्यांदाच दुसऱ्या एका आकाशगंगेतील ब्लॅक होलचे चित्र प्रदर्शित करण्यात आलं होतं हे विशेष. 


 






आकाशगंगेच्‍या मध्‍यभागी असलेल्‍या सुपरमॅसिव्‍ह ब्‍लॅकहोल Sagittarius A* (star) चे छायाचित्र खगोलशास्त्रज्ञांकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. नासाच्या चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरीसह अनेक दुर्बिणींनी, इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (EHT) सह एकाच वेळी आकाशगंगेच्या महाकाय कृष्णविवराचे निरीक्षण करण्यात येतं. इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप (इएचटी) मध्ये जगभरातल्या निरनिराळ्या ठिकाणांहून मिळालेली माहिती, फोटो जमा करून त्यावर संगणकाच्या मदतीने अभ्यास होतो. 


ब्लॅक होलला समजून घेण्यासाठी डाटा आणि छायाचित्र अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. नासाकडून या आधी ब्लॅकहोलचा आवाज जारी करण्यात आला होता.