Diksha Dagar : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी दिक्षा डागर आहे तरी कोण?
गोल्फर दिक्षा डागरने ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोल्फ खेळात दमदार कामगिरी करत दिक्षाने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे.
विशेष म्हणजे दिक्षाने याआधी टर्की इथे झालेल्या 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.
दिक्षा भारताची आघाडीची गोल्फर असून 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे.
श्रवणदोष असणारी दिक्षाने वयाच्या सहाव्या वर्षापासून श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
पण बालपणीपासूनच खेळाची आवड असलेल्या दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे.
21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे.
अनेक युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे. 2019 च्या सुरुवातीलाच दिक्षाने दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली महिला ओपन गोल्फ स्पर्धाही जिंकली होती.