एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या सिंधमध्येही स्वातंत्र्याचे नारे, वेगळ्या सिंधूदेशाची मागणी
इस्लाबाद : पाकिस्तानमध्ये बंडखोरीचा आवाज दिवसेंदिवस वाढत आहे. गिलगिट, बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरनंतर बंडखोरीचा वणवा आता पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातही पोहोचला आहे. एकीकडे लोक वेगळ्या बलुचिस्तानची मागणी करत असा स्वतंत्र सिंधू देशाच्याही मागणीने जोर धरला आहे.
सिंध प्रांताच्या मीरपूर खासमधील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात त्यांनी स्वतंत्र सिंधूदेशाची मागणी केली.
बलुचिस्तानात तिरंगा फडकवला, मोदींचा फोटोही झळकला!
https://twitter.com/ANI_news/status/770098682590928896 पाकिस्तानात जेवढे हिंदू आहेत, त्यापैकी सर्वाधिक सिंध प्रांतात राहतात. या भागात हिंदू व्यापाऱ्यांचा अधिक प्रभाव आहे. 1947 च्या आधीपासून इथे गुजराती भाषा बोलणारे पारशी समाजाचे लोकही राहतात होते. पाकिस्तान बनल्यानंतर जसजसा इस्लामिक कट्टरतावाद्यांचा प्रभाव वाढला, तसतसं सिंध प्रांतात राहणं हिंदूंसाठी कठीण होत गेलं. यानंतर हिंदूंनी सिंधमधून मोठ्या संख्येने पलायन केलं आहे.लाल किल्ल्यावरुन मोदींचं भाषण, बलुचिस्तानात वाहवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. तसंच बलुचिस्तान, गिलगिलत-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आपले आभार मानल्याचंही ते म्हणाले होते. भेदभाव बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याचा आवाज उठला. त्यानंतर पाकिस्तानात निर्वासितांप्रमाणे जगणाऱ्या सिंध प्रांतातील नागरिकही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचं समर्थन करत आहेत.खुद्द पाकिस्तानातच पाकविरोधी घोषणाबाजी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement