एक्स्प्लोर
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला

इस्लामाबादः भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी पाकने भारताला ऑल आऊट करण्याची मोहिम हाती घ्यावी, असं वादग्रस्त विधान पाकचा माजी क्रिकेटर जावेद मियादाद याने केलं आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याने जावेदला संताप अनावर झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे. भारतीय लष्कराने उरी हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून उरी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय जवानांच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जवळपास 50 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताने दहशतवादाविरोधात कारवाई केली आहे, तरीही पाकिस्तानच्या जनतेचा संताप होत आहे, हे विशेष.
आणखी वाचा























