एक्स्प्लोर

Sam Altman : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ऑली'? जाणून घ्या

OpenAI CEO Sam Altman Marriage : ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी त्यांचा समलैंगिक मित्र ऑलिव्हर (Oliver Mulherin) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Sam Altman Marriage : ओपन एआयचे (OpenAI) संस्थापक सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांचा मित्र आणि समलैंगिक प्रियकर ऑलिव्हर मुल्हेरिन (Oliver Mulherin) याच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. सॅम अल्टमन आणि ऑली यांचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत खाजगीरित्या पार पडला. बुधवारी हवाईमध्ये हा लग्न समारंभ झाला. लग्नादरम्यान दोघेही व्हाईट कलर थीममध्ये दिसले. दोघांनीही पांढरा शर्ट, फिकट बेज पॅन्ट आणि पांढरे स्नीकर्स घातले होते.

सॅम अल्टमन अडकला विवाहबंधनात

लग्नासाठी कुटुंबातील सदस्यांसह काही जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी, लॅटिसचे संस्थापक आणि सॅम यांचा भाऊ जॅक अल्टमन उपस्थित होते. तांत्रिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सॅम अल्टमन आणि ऑलीला लग्नाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोसची पार्टनर लॉरेन सांचेझ, अलेक्झांडर वांग, शेरविन पिशेवर, जेन मातोशी आणि एड्रियन औन यांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

गेल्या वर्षी केली होती नात्याची घोषणा

सॅम अल्टमॅन यांनी गेल्या वर्षी मित्र आणि समलैंगिक पार्टनर ऑलिव्हरसोबत जगाला त्यांच्या प्रेमाच्या नात्याची माहिती दिली होती. एका न्यूज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सॅम अल्टमॅन यांनी सांगितलं होतं की, ते आणि ऑली सॅन फ्रान्सिस्कोमधील रशियन हिलवर एकत्र राहतात.

कोण आहे ऑलिव्हर मुल्हेरिन?

सॅम ऑल्टमनचा जोडीदार ऑलिव्हर मुल्हेरिन यांना ऑली म्हणूनही ओळखलं जातं. सॅम आणि ऑली यांची मैत्री खूप जुनी आहे. ऑलिव्हर मुल्हेरिनने मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतलं आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) क्षेत्रात त्यांनी विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याव्यतिरिक्त, ऑलिव्हरने विद्यापीठात असताना वेगवेगळ्या एआय प्रकल्पांवर काम केलं आहे.

व्हाईट हाऊसच्या डिनर पार्टीत दिसले एकत्र

सॅम ऑल्टमन आणि ऑलिव्हर मुल्हेरिन यांची मैत्री खूप जुनी आहे. पण, दोघेही सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळा एकत्र दिसले आहेत. गेल्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये पीएम मोदींच्या स्वागतासाठी आयोजित डिनरमध्ये दोघे एकत्र दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Embed widget