Imran Khan: पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती क्षणोक्षणी बदलत आहे. पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीच्या उपसभापतींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेपूर्वी 3 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत सभागृह तहकूब केली आहे. अविश्वास प्रस्तावावर 3 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा टळल्याने पंतप्रधान इम्रान खान यांना 72 तासांचा अतिरिक्त कालावधी मिळाला आहे. सभागृह तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शने करत संसदेत 'इम्रान गो' अशा घोषणा दिल्या. 


याच दरम्यान पीएमएल (एन) नेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली. ते म्हणेल आहेत की, त्यांना या पदावर कायम राहण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे बहुमत आहे, आम्हाला संधी दिली पाहिजे. इम्रान खान खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. ते भारताचं नाव घेऊन खोटी माहिती पसरवत आहेत. ते म्हणाले, संविधानाची पायमल्ली झाली. सभापतींनीही संविधानाचे उल्लंघन केले आहे. याच दरम्यान इम्रान खान यांनी यापूर्वी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची आणि संसद बरखास्त करण्याची ऑफर दिली होती. मात्र विरोधकांनी ही ऑफर फेटाळून लावली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक विरोधी नेत्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर विश्वास ठेवू नये, अशी शिफारस केली आहे. विरोधकांनी सभापतींना या प्रस्तावावर लवकरात लवकर मतदान घेण्यासाठी विनंती केली आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे बहुमत आहे, या प्रस्तावावरील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास त्यांना फायदा होईल.


पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) एका बैठकीचे नेतृत्व केलं आहे. कारण नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याबाबत राजकीय दबाव वाढला आहे. दरम्यान, 3 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार आहे. या मतदानात इम्रान सरकार कोसळेल की वाचेल हे पाहावं लागले.


महत्त्वाच्या बातम्या: