लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप पाकिस्तान तेहरिक ए इस्लाम या पक्षाचे वरिष्ठ नेते फैजल वावडा यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या जीवाला धोका असून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना खबरदारी घ्यावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे. पंतप्रधान इम्रान खान हे आज संध्याकाळी पाकिस्तानला संबोधित करणार होते, पण त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. 


पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार कधीही पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला अस्थिर करण्याचा परकीय देशांचा डाव असल्याचा आरोप इम्रान खान यांनी करत सर्व पत्रकारांना तशी एक चिठ्ठी लिहिली आहे. इम्रान खान यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव जर संसदेत मंजूर करण्यात आला तर पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये वाढ होईल असं इम्रान खान यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. 


 






पाकिस्तानमधील राजकीय गणित
पाकिस्तानच्या संसदेमध्ये एकूण 342 सदस्य आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. एमक्यूएम या पक्षाने इम्रान खान यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर विरोधी पक्षाकडे आता 177 सदस्य संख्या झाली असून इम्रान खान यांनी बहुमत गमावल्याची स्थिती आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला असून विरोधी पक्षांकडे त्यासाठीचा 172 हा बहुमताचा आकडा आहे. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


ABP Majha