एक्स्प्लोर
अलिबागचा बंगला उद्ध्वस्त, मात्र नीरव मोदी लंडनमध्ये अलिशान फ्लॅटमध्ये, नवा लूकही समोर
नीरव मोदी वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं 'टेलिग्राफ'च्या वृत्तात म्हटलं आहे. सेंटर पॉईंट टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये नीरवचं वास्तव्य असल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला उद्ध्वस्त केला असतानाच परदेशात मात्र त्याचा मुक्त संचार असल्याचं समोर आलं आहे. भारतातून पोबारा करुन गेलेला नीरव मोदी बिनबोभाटपणे वावरत असल्याचं समोर आलं आहे. 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्राने याबाबतचा दावा केला आहे.
नीरव मोदी वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं 'टेलिग्राफ'च्या वृत्तात म्हटलं आहे. सेंटर पॉईंट टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये नीरवचं वास्तव्य असल्याचा दावा केला जात आहे. लंडनमधील रस्त्यावर फिरताना वेगळ्याच लूकमधील नीरवशी 'टेलिग्राफ'च्या प्रतिनिधींनी बातचितही केली.
इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत नीरवच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.
नीरव मोदी हा 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा फरार आरोपी आहे. त्याचा अलिबागच्या समुद्रकिनारी वसलेला अलिशान बंगला सरकारने काल स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त केला. 110 डायनामाईट, 30 किलो स्फोटकांद्वारे 30 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात पसरलेला हा बंगला जमीनदोस्त केला.
50 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा हा बंगला पाडल्यानंतर ईडी तिथल्या जमिनीचा लिलाव करेल, जेणेकरुन बँकांना झालेल्या नुकसानाची भरपाई होईल. नियम धाब्यावर बसवून 1985 मध्ये हा बंगला बांधण्या आला होता.
नीरव मोदीचा बंगला उद्ध्वस्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement