एक्स्प्लोर
नयनरम्य रोषणाई, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचं स्वागत
ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करून 2018 चं स्वागत करण्यात आलं.

ऑकलंड : नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये मोठ्या उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करून 2018 चं स्वागत करण्यात आलं.
स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.
भारतातही नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. कोकण, गोवा यांसह अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहे. मुंबईतील गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गर्दी करत असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
