एक्स्प्लोर
उद्योजक नेस वाडियाला जपानमधील कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा
नेस वाडिया मार्च महिन्याच्या सुरुवातीला जपानला गेला असताना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला न्यू चिटोज विमानतळावर अटक झाली होती.

टोकियो : भारतीय उद्योगपती नेस वाडियाला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमधील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जपानमध्ये सुट्टीनिमित्त गेले असताना नेस वाडियाने अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. होक्काईदो या उत्तर जपानमधील द्वीपकल्पावर स्कीईंग करण्यासाठी नेस वाडिया मार्च महिन्याच्या सुरुवातीला गेला होता. त्यावेळी न्यू चिटोज विमानतळावर नेसला अटक झाली होती. जपानी माध्यमातील वृत्तानुसार सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान नेस वाडियाकडून 25 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. वाडिया हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानलं जातं. वाडिया उद्योग समूहाला जवळपास 283 वर्षांचा इतिहास आहे. प्रसिद्ध उद्योजक नस्ली वाडियांचे सर्वात मोठा मुलगा नेस वाडिया किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे. फोर्ब्ज मासिकाच्या अहवालानुसार वाडिया कुटुंबाची संपत्ती सातशे कोटी रुपयांच्या घरात आहे. वाडिया समूहाकडे ब्रिटानियापासून गो एअर या विमान कंपनीचा समावेश आहे. नेस वाडियाविरोधात अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाची तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अखेर नेस वाडियाला दिलासा दिला. विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता.
आणखी वाचा























