एक्स्प्लोर
Advertisement
एलियन्स की माणूस, नासाने शोध लावला, 20 ग्रह राहण्यासाठी योग्य!
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा शोध लावला आहे.
नवी दिल्ली: ज्याप्रमाणे ‘कोई मिल गया’ सिनेमात एलियन्स पाहायला मिळाले, तसेच एलियन्स आता प्रत्यक्षात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा शोध लावला आहे. नासाच्या केपलर दुर्बिनीद्वारे या ग्रहांचा शोध घेण्यात आला आहे.
महत्त्वाचं म्हणजे या 20 ग्रहावर एलियन्सचा अधिवास असू शकतो किंवा माणसाला तिथे राहण्याजोगी स्थिती आहे, असा शोध नासाने दुर्बिणीच्या साहाय्याने लावला आहे. पृथ्वी किंवा धरतीप्रमाणे दुसरं व्हर्जन नासाने शोधलं आहे.
नासाच्या केप्लर मिशनने 20 अशा ग्रहांचा शोध घेतला आहे, ज्यांची परिस्थिती पृथ्वी किंवा धरतीसारखीच आहे. याचाच अर्थ सध्या तिथे जीव आहेत किंवा तिथे जिवंत राहता येईल.
या ग्रहांमधील एक 7923.0 नावाचा ग्रह आहे जो पृथ्वी 2.0 म्हणून ओळखला जात आहे. या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास 395 दिवस लागतात, त्यामुळे इथे पृथ्वीप्रमाणे 365 दिवसांचं नाही तर 395 दिवसांचं वर्ष असेल.
हा ग्रह थोडा थंड आहे, हा पृथ्वीच्या आकाराच्या 97 टक्के आहे. या ग्रहावरील उष्णता म्हणजे आपल्याकडील थंडी आहे. मात्र त्याचा माणसावर काही खास फरक पडणार नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला.
जर अंतराळात यान सोडायचं असेल, तर हा ग्रह यासाठी उत्तम पर्याय ठरेल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
दुसरं जग शोधण्यासाठी 2009 मध्ये पाठवलेल्या केपलरला मध्यंतरी अनेक तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र त्या वेळोवेळी दुरुस्त करण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement