NASA Scientists Crack Mystery of Explosions : नासाने (NASA) आता 60 वर्षे जुनं गूढ उकललं आहे. नासामधील शास्त्रज्ञांना सूर्यावर स्फोट आणि सौरवादळ का निर्माण होतात, याचं कारण शोधण्यात यश मिळालं आहे. सूर्यावर अनेकदा स्फोट होतात आणि याचा परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. यामुळे नासाकडून सूर्यावर होणाऱ्या स्फोटामागची आणि सौरवादळाची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरु होता. यामध्ये अखेर नासाला यश आलं आहे. नासाने या संशोधनाद्वारे सूर्यावर स्फोट कसा होतो आणि त्याचा भूचुंबकीय वादळं आणि याचा पृथ्वीवर होणारा परिणाम याबाबत अभ्यास केला आहे. नासाच्या मॅग्नेटोस्फेरिक मल्टीस्केल मिशन (MMS) मधील शास्रज्ञांच्या चमूने मॅग्नेटिक रीकनेक्शन कसं घडते, केव्हा घडतं, हे सतत गतीनं का घडते या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांनी याबाबत काही सिद्धांत मांडले आहेत. 


नासाच्या मते, सूर्यावर होणारे स्फोट हे चुंबकीय बल अथवा चुंबकीय जोडणीमुळे होतात. नासाने याला 'मॅग्नेटिक रिकनेक्शन' असं म्हटलं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ज्वाला निर्माण होतात. यावेळी काही मिनिटांमध्ये निर्माण होणाऱ्या ज्वालांमध्ये संपूर्ण जगाला 20 हजार वर्षे पुरेल एवढी ऊर्जा निर्माण होते. यावरून याच्या परिणामांचा अंदाज घेता येईल. ही प्रक्रिया कशी होते हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी गेली अर्धशतकं घालवली आहेत.


शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यावरील ज्वालांपासून पृथ्वीच्या जवळील अंतराळापर्यंत, कृष्णविवरांपर्यंत (Black Hole), संपूर्ण विश्वातील प्लाझ्मा चुंबकीय जोडणीमधून जातात. ज्यामुळे चुंबकीय ऊर्जेचे उष्णतेत रुपांतर होऊन ज्वालांचा वेग वाढतो. यामुळे सौरवादळ तयार होते. चुंबकीय जोडणीचे म्हणजेच 'मॅग्नेटिक रिकनेक्शन'चे अनेक प्रकार आहेत. यामध्ये जलद गतीने आणि मंद गतीने तयार होणारी चुंबकीय जोडणी असे प्रकार आहेत.


नासामधील शास्त्रज्ञांनी चुंबकीय बल वापरून हा सिद्धांत सिद्ध केला आहे. शास्रज्ञांनी सांगितले की, दैनंदिन तंत्रज्ञानामध्येही चुंबकीय जोडणी वापरली जाते. जसे की वाहन व्हील स्पीड सेन्सर आणि थ्रीडी प्रिंटरमध्ये वापरतात. यामध्ये सेन्सर गती, अंतर, स्थिती किंवा विद्युत प्रवाह मोजतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :