Geomagnetic Storm :  सौर वादळ आज पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर सौर वादळ धडकल्यास जगभरातील वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. नासा आणि नॅशनल ओशोनिक अॅण्ड अॅटमॉस्फेयरिक अॅडमिनिस्ट्रेशनने (NOAA) याबाबत माहिती दिली. 


सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास इलेक्ट्रिकल ग्रीड आणि इतर उपकरणांचे मोठे नुकसान होऊ शकते. सौर वादळाचा वेग हा 429 ते 575 किमी प्रती सेकंद इतका असू शकतो. वैज्ञानिकांनी सांगितले की, सुर्याच्या पृष्ठभागावर बदल दिसून आला आहे. 


सुर्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्याने सौर वादळ तयार होतात. या स्फोटामुळे सौरमालेत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पसरू शकते. सौर वादळ पृथ्वीवर आल्याचे त्याचे परिणाम जाणवू शकतात असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 


NOAA ने सांगितले की, अधिक उंचावरील ठिकाणांवर याचा परिणाम दिसून येऊ शकतो. सौर वादळामुळे रेडिओ सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय काही मध्यम प्रमाणावरील ठिकाणांवर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. 






मागील वर्षीदेखील 13 जुलै रोजी सौर वादळ पृथ्वीवर धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी वीज पुरवठा खंडित होण्यासह मोबाइल फोन, दूरध्वनी, इंटरनेटवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, त्यावेळेस सौर वादळ पृथ्वीवर आदळले नाही. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या :