(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Europe : जर्मनीमध्ये राहणाऱ्या भारतीय चिमुकल्यानं गायलं देशभक्ती गीत; पंतप्रधानांनी दिली शाब्बासकीची थाप
हॉटेल एडलान केम्पिंस्की येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Europe : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या तीन दिवसीय यूरोप (Europe) दौऱ्यावर आहेत. आज (2 एप्रिल) सकाळी मोदी हे जर्मनीची राजधानी बर्लिन (Berlin) येथे दाखल झाले. बर्लिनमधील भारतीयांची भेट घेतली. हा कार्यक्रम हॉटेल एडलान केम्पिंस्की येथे आयोजित करण्यात आला होता. जर्मनीमध्ये राहणारे भारतीय लोक हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी जेव्हा एडलान केम्पिंस्की येथे पोहोचले तेव्हा तेथील लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मोदी हे लवकरच ‘वंदे मातरम’आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. मोदींना भेटण्यासाठी लहान मुलं देखील उपस्थित होते. या लहान मुलांमधील एका मुलानं नरेंद्र मोदी यांना एक देशभक्ती गीत ऐकवले. हे गीत ऐकल्यानंतर मोदींनी त्या मुलाचं कौतुक केलं. तसेच अनन्या मिश्रा नावाच्या मुलीनं मोदींना एक खास पेटिंग दाखवलं. हे पेटिंग अनन्यानं मोदींना दिले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पेटिंगवर सही केली.
#WATCH PM Narendra Modi in all praises for a young Indian-origin boy as he sings a patriotic song on his arrival in Berlin, Germany pic.twitter.com/uNHNM8KEKm
— ANI (@ANI) May 2, 2022
पंतप्रधानांना भेटण्यासाठी भारतीय समुदायाचे लोक 400 किमी प्रवास करून बर्लिन येथे आले होते. अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढला. तसेच काहींना मोदींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Boris Johnson JCB : भारतात जेसीबीवर फोटो काढण्यावरून वाद; ब्रिटनमध्ये PM जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी
- Ukraine Russia War : 67 व्या दिवशीही युद्ध सुरू, रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनच्या ओडेसा शहराचा रनवे उद्ध्वस्त
- PM Modi Europe Visit : 65 तास, 25 बैठका आणि 8 जागतिक नेत्यांशी चर्चा! PM मोदी आज पहाटे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी रवाना