एक्स्प्लोर
मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस
माउंट एलब्रुस हे युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत मानला जातो.
![मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस mountaineer deepak konale from latur climbed Mount Elbrus and hurled tricolor in Europe latest updates मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/09165545/mount-elbrus-web.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : युरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे.
युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत माउंट एलब्रुस आहे. निद्रिस्त ज्वालामुखी असलेल्या हा पर्वत सर करण्यात भारतातील दहा गिर्यारोहकांना यश आले आहे. यात महाराष्ट्रातील दीपक कोनाळेचा समावेश आहे. दीपक कोनाळे हा लातूरचा रहिवासी आहे. माउंट एलब्रुस हे युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत मानला जातो.
या पर्वताची उंची पाच हजार 642 मीटर आहे. सतत बदलणारं वातावरण, उणे 25 अंश तापमान, वारे या सर्वांचा सामना करत भारतातील हे पथक सहा तारखेला शिखरावर पोहोचलं होते. ही मोहीम एक तारखेपासून सुरु झाली होती. मोहिमेत सहभागी झालेल्या पथकात महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश या राज्यातील गिर्यारोहकांचाही समावेश होता, ज्यात दोन मुलीही सहभागी होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
बातम्या
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)