French Fries shortage in Japan : जपानमध्ये सध्या जगातील सर्वात मोठी फास्ट फूड कंपनी असलेल्या मॅकडॉन्लड्सला फ्रेंच फ्राइसचा तुटवडा जाणवत आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये जपानमध्ये बटाट्याचा तुटवडा जाणवत आहे. चिप्सच्या कमतरतेमुळे कंपनी फक्त लहान आकाराचे फ्रेंच फ्राईज विकणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फ्रेंच फ्राईज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बटाट्याच्या पुरवठ्यात उशीर होत आहे. त्यामुळे आता जपानमध्ये 30 डिसेंबरपर्यंत फक्त लहान आकाराचे फ्रेंच फ्राईज विकले जाणार आहे. 


मॅकडॉन्लड्सने सांगितले की, 30 डिसेंबरपर्यंत जपानमध्ये मध्यम आकाराचे आणि मोठ्या आकाराचे फ्रेंच फ्राईज विकले जाणार नाहीत. बटाट्याच्या कमतरतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. फ्रेंच फ्राइजसाठी वापरण्यात येणारे बटाटे कॅनडामध्ये व्हँकुव्हर जवळच्या बंदरातून आयात केले जातात. पुरामुळे झालेले नुकसान आणि महासाथीमुळे जहाजांना मालवाहतूक करण्यास उशीर होत आहे. 


मॅकडॉनल्डसने असा निर्णय पहिल्यांदा घेतला नाही. वर्ष 2014 मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर 29 बंदरांवर 20 हजार गोदी कामगार, टर्मिनल ऑपरेटर्स आणि  शिपिंग लाइनमध्ये झालेल्या एका औद्योगिक वादामुळे जहाज वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यावेळी मॅकडॉनल्डने जपानमध्ये केवळ एक हजार टन बटाट्याची विक्री करत लहान आकाराच्या फ्रेंच फ्राइजची विक्री केली होती. लहान आकाराच्या फ्रेंच फ्राइस तयार करण्यास बटाट्यांचा वापर कमी होतो. 


ब्रिटनमध्येही मॅकडॉनल्डस समोर अशी समस्या उद्भवली होती. ब्रिटनच्या 1250 आउटलेट्सवर शेक आणि बॉट्ल ड्रिंक्स उपलब्ध करू देण्यात अडचणींचा सामना करावा लागला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha