Dinosaur Embryo Found : महाकाय डायनासोर नामशेष झाल्याचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अशातच शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण अगदी व्यवस्थित जतन केलेलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, हे अंड 66-72 मिलियन (7 कोटी 20 लाख) वर्षांपूर्वीचं आहे. सापडलेल्या या भ्रूण 'Baby Yingliang' या नावानं ओळखलं जाणार आहे. जिआंग्शी प्रांतातील गांझू शहरातील शाहे इंडस्ट्रियल पार्कमधील 'हेकोऊ फॉर्मेशन'च्या खडकांमध्ये हे डायनासोरचं अंड सापडलं होतं.
बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या जीवाश्म शास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा भ्रूण ओविराप्टोरोसॉर प्रजातीचा आहे, ज्याला दात आणि चोच नव्हती. ओविराप्टोरोसॉर पंख असणारे डायनासोर होते, जे आशिया आणि उत्तर अमेरिकेतील पर्वतरांगांमध्ये आढळून येत होते. त्यांची चोच आणि शरीराचा आकार वेगळा असायचा. हा भ्रूण आतापर्यंत सापडलेला सर्वात 'पूर्णपणे ज्ञात डायनासोर भ्रूण' आहे.
अंड्यातील भ्रूण पूर्णपणे वाढ झालेलं
डेलीमेलनं दिलेल्या बातमीनुसार, बेबी यिंगलियांग अंड्यातील भ्रूण पूर्णपणे वाढ झालेलं आहे. त्याचं डोकं शरीराच्या खाली होतं, त्याची पाठ अंड्याच्या आकारानुसार वळालेली होती आणि त्याचे पाय डोक्याच्या दिशेला होते. पक्ष्यांमध्ये या प्रकारची मुद्रा 'टकिंग' दरम्यान दिसते. म्हणजेच, ज्यावेळी पक्षांच्या अंड्यातून पिलाची पूर्णपणे वाढ होते आणि पिल्लू अंड्यातून बाहेर येते त्यावेळी जी मुद्रा असते, त्याच मुद्रा या अंड्यातील भ्रूण होतं. टकिंग ही मध्यवर्ती मज्जासंस्थेद्वारे नियंत्रित केलेली प्रक्रिया आहे. जी यशस्वी उबवणुकीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
डायनासोरचं भ्रूण मिळणं सर्वात दुर्मिळ गोष्ट
बेबी यिंगलियांगमध्ये अशा वर्तनाचा शोध असे सूचित करतो की ते पक्ष्यांसाठी 'अद्भुत' नाही. हे सर्वात प्राचीन नॉन-एव्हियन थेरोपॉड डायनासोरमध्ये विकसित झाले असावे. हा रिसर्च युनिवर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमच्या जीवाश्म विज्ञानी फियोन वॅसम माई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. ते म्हणाले की, "डायनासोरचं भ्रूण काही सर्वात दुर्मिळ जीवाश्मांपैकी एक आहे आणि यापैकी जास्तीत जास्त हाडं नसलेले असतात. आम्ही 'बेबी यिंगलिआंग'च्या शोधाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron : बिल गेट्स म्हणतात ओमायक्रॉन लवकरच संपुष्टात येईल पण...
- अमेरिकेत ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू; राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले...
- कोरोना महासाथीचा परिणाम; अमेरिकेत लोकसंख्या वाढीचा दर घसरला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह