Bill Gates on Omicron : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या बिल गेट्स (Bill Gates) यांनी म्हटले आहे की, ''योग्य उपाययोजना केल्यास ओमायक्रॉन संपुष्टात येईल.'' जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) संकट अधिक वाढत चालले आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन अधिक वेगान पसरताना पाहायला मिळतोय. भारतातही ओमायक्रॉनचे वाढते संकट आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचे आवाहन आणि धोक्याचा इशारा देण्यात येतोय. आता जगातिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 


बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, ''ओमायक्रॉन अतिशय वेगाने पसरतो. मात्र, ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामध्ये चांगली बातमी अशी आहे की, एकदा तो एखाद्या देशात प्रबळ झाला की तेथील लाट तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी असते. ते काही महिने वाईट असू शकतात, परंतु मला अजूनही विश्वास आहे की जर आपण योग्य पावले उचलली तर 2022 मध्ये साथीचा रोग संपुष्टात येईल ''






 


बिल गेट्स यांनी ओमायक्रॉनबाबत धोक्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी म्हटले की, ओमायक्रॉन व्हेरियंट अतिशय वेगाने पसरत आहे. लवकरच हा ओमायक्रॉन जगभरातील कानाकोपऱ्यात कहर माजवेल. बिल गेट्स यांनी ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहता ख्रिसमसनिमित्तचे आपले बहुतेक कार्यक्रम आणि सुट्ट्या रद्द केल्याचे सांगितले आहे. त्यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.




 


बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे की, ''जेव्हा असे वाटत होते की जीवन पूर्वीप्रमाणे सामान्य होईल, तेव्हाच आपण साथीच्या आजाराच्या अधिक गंभीर प्रकारात प्रवेश करतोय. ओमायक्रॉन लवकरच घराघरात पोहोचेल. माझ्या जवळच्या मित्रांनाही ओमायक्रॉनची लागण झालीय त्यामुळे मी नवीन वर्षानिमित्तच्या माझ्या बहुतेक सुट्ट्या आणि कार्यक्रम रद्द केले आहेत.''


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha