Coronavirus Updates :  जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोना महासाथीमुळे अनेक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्यापासून ते अर्थव्यवस्थेवरदेखील कोरोनाने परिणाम केले. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतीललोकसंख्या वाढीचा दर घटला असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमी जन्मदर असल्याचे म्हटले जात आहे. 


अमेरिकेच्या जनगणना ब्युरोने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत अमेरिकेतील लोकसंख्येत फक्त 3,92,665 इतकी वाढ झाली आहे. ही वाढ म्हणजे 0.1 टक्के इतकीच असल्याचे समोर आले.


वर्ष 1937 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील लोकसंख्येत 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेतील जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यांची संख्या मोजून लोकसंख्येचा अंदाज लावला जातो. प्रथमच, आंतरराष्‍ट्रीय स्थलांतराच्या वाढीने जन्माच्‍या नैसर्गिक वाढीचा आकडा ओलांडला आहे.


आंतरराष्ट्रीय स्थलांतरामुळे सुमारे 2,45,000 नागरिकांची निव्वळ वाढ झाली, परंतु नैसर्गिकरित्या केवळ 1,48,000 रहिवाशांची वाढ झाली. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक विल्यम फ्रे म्हणाले की, लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्याची अपेक्षा होती, परंतु एवढ्या प्रमाणात कमी होईल असे वाटले नाही. महासाथीचा आपल्या आयुष्यावर सर्व बाबतीत मोठा प्रभाव पडला आहे, हे यातून दिसून येते. 


फ्रे यांनी म्हटले की, साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवल्यानंतर, अमेरिकेमध्ये मृत्यूची घट नोंदवली जाऊ शकते, परंतु कमी जन्मदरामुळे मागील वर्षांच्या तुलनेत लोकसंख्या वाढीच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा फार कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha