हैदराबादमधील उर्दू विद्यापीठाने तुर्कीच्या प्राध्यापकाला दाखवला घरचा रस्ता; 5 वर्षाचा करार तातडीने रद्द
मुंबई विमानतळावर Celebi NAS Amid कंपनी कार्यरत असून या कंपनीविरोधात शिवसेनेनं निदर्शन करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

हैदराबाद : भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सैन्य कारवाई आणि युद्धजन्य परिस्थिती तुर्की आणि अझरबैजान या दोन देशांनी उघडपणे पाकिस्तानचा पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे, भारतीयांनी या दोन देशांबद्दल आपली कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. भारत सरकारने देखील तुर्की (turkey) देशाला दणका द्यायचं ठरवल्याचं दिसून येत आहे. देशभरात "बॅन टर्की" चळवळ उभी राहत असून पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकून निर्णायक कारवाई केली. स्थानिक आयातीऐवजी इतर व्यापाऱ्यांकडून खरेदी करणे पसंत करून सामान्य नागरिकदेखील या चळवळीत आपलं योगदान दिलं. तर ट्रॅव्हल्स एजन्सींकडूनही तुर्की देशातील पर्यटनासाठी बुकींग न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, व्यापार उद्योगात तुर्की देशाला मोठा फटका बसणार आहे. त्यातच, हैदराबादमधील उर्दू विद्यापीठात (University) शिकवणाऱ्या तुर्कस्थानी प्राध्यापकांची घरवापसी करण्यात येत आहे.
मुंबई विमानतळावर Celebi NAS Amid कंपनी कार्यरत असून या कंपनीविरोधात शिवसेनेनं निदर्शन करून कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर मूळची तुर्कीची असलेल्या या कंपनीचे भारतातील हँडलिंग सेवा देण्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आले आहे. दुसरीकडे भारतीय चित्रपट निर्मात्यांना वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज फेडरेशन (FWICE) ने तुर्कीला शूटिंग लोकेशन म्हणून निवडण्यापासून टाळण्याची विनंती केली होती. तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने पाठिंबा दाखवल्याने भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात उभं राहत असल्याने हे आवाहन करण्यात आलं आहे. त्यातच, हैदराबाद येथील उर्दू विद्यापाठीनेही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांचा करार तात्काळ रद्द
हैदराबाद येथील मौलाना आझाद केंद्रीय उर्दू विद्यापीठातून तुर्कस्थानी प्राध्यापकाची घरवापसी करण्यात आली असून तुर्कस्तानसोबतचा सामंजस्य करार देखील रद्द करण्यात आला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर आता मौलाना आझाद विद्यापीठानेही तुर्कस्थानला त्यांची जागा दाखवत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुर्कीतील युसून इमर इंस्टीट्यूटसोबत असलेला करार मौलाना आझाद केंद्रीय उर्दू विद्यापीठाने रद्द केला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी हा करार करण्यात आला होता, तिथून पुढील 5 वर्षासाठी हा करार करण्यात आला होता. मात्र, भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्ह विद्यापीठाने हा करार रद्द करत तुर्कस्थानच्या प्राध्यपाकांना घरचा रस्ता दाखवला आहे. तुर्की भाषा शिकवण्यासंदर्भात एक डिप्लोमा कोर्स येथील विद्यापीठात सुरू होता, तो आता बंद करण्यात आला आहे.
पर्यटकांकडून बुकींग रद्द
पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अजरबैजानला जाणाऱ्या 60 टक्के पर्यटकांनी आपले नियोजित बुकिंग रद्द केल्याची माहिती ट्रॅव्हल्स एजेंट असोसिएशन ऑफ इंडियाने दिली. MakeMyTrip, EaseMyTrip, Cox & Kings, Travomint आणि Pickyourtrail यांसारख्या प्रमुख भारतीय पर्यटन कंपन्यांनी तुर्की आणि अझरबैजानसाठी सर्व बुकिंग्ज स्थगित केल्या आहेत. या कंपन्यांनी सुरक्षा, राजनैतिक संवेदनशीलता आणि राष्ट्रीय हित यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा
39 वर्षांपासून दिमाखात उभा असलेला शिवरायांचा पुतळा हटणार; नव्या पुतळ्यासाठी 10 कोटी मंजूर























