एक्स्प्लोर
VIDEO : धुम्रपान करु न दिल्याने प्रवाशाची महिला चालकाला मारहाण
नवी दिल्लीः धुम्रपान करण्यास विरोध केल्याने त्या प्रवाशाने चक्क महिला बस चालकाला धावत्या बसमध्येच अमानुष मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चीनमधील सुझोऊ शहरातील ही घटना असल्याचं समजतं. बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
धुम्रपान करण्यास विरोध केल्याने प्रवाशाने महिला चालकासह सीटवरच झटापट सुरु केली. त्यानंतर तिला सीटवरुन ओढून हिंसक पद्धतीने मारहाण केली.
बसमधील प्रवाशांनी केली महिलेची सुटका
सुदैवाने महिलेने प्रसंगावधान राखत गाडी तातडीने थांबवली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. महिलेच्या प्रतिकारानंतरही प्रवासी तिला वारंवार मारहाण करत होता. प्रवाशाने चालक महिलेला सीटवरुन ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर बसमधील इतर प्रवाशांनी तिची सुटका केली.
दरम्यान, चीनमध्ये पहिला धुम्रपान बंदीचा कायदा 2014 मध्येच लागू झाला आहे.
पाहा व्हिडीओ
(Video courtesy-CCTV News/Facebook)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement