एक्स्प्लोर
अमेरिकेत म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार, 50 मृत्यूमुखी
या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला.
लास वेगास : अमेरिकेतील लास वेगास शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. बंदूकधाऱ्यांनी मांडले बे रिसॉर्टमधील कॅसिनोवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यापैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.
स्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला.
यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. एका शूटरला कंठस्नान घातल्याची माहिती लास वेगास पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. याशिवाय कोणीही घटनास्थळी न जाण्याचं आवाहनही केली आहे. तसंच बंदूकधाऱ्यांच्या शोधासाठी स्वॉट पथक दाखल झालं आहे.
मॅकरेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानं वळवण्यात आली आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement