एक्स्प्लोर
कुवेतमध्ये बस अपघातात सात भारतीयांसह 15 जणांचा मृत्यू
दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

कुवेत : कुवेतमध्ये प्रवाशांनी खच्चून भरलेल्या दोन बसेसची टक्कर होऊन तेल कंपनीच्या 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, यामध्ये सात भारतीयांचा समावेश आहे. दक्षिण कुवेतमध्ये सातव्या रिंग रोडजवळ रविवारी हा अपघात झाला. दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. तेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस अपघातग्रस्त झाली. केओसी (कुवेत ऑईल कंपनी) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सात भारतीय, पाच इजिप्शियन तर तीन पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. दोघा भारतीयांची प्रकृती गंभीर असून एका कुवेती नागरिकाचाही जखमींमध्ये समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढलं. जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयाच उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























