al zawahiri : दहशतवादी संघटना अल कायद्याचा म्होरक्या अल जवाहिरीनं (al zawahiri) नुकताच एक नऊ मिनीटांचा व्हिडीओ जाहीर केला आहे. या व्हिडीओमध्ये जवाहिरी हा भारतातील हिजाब प्रकरणावर गरळ ओकून भारतातील लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केलाय. मंगळवारी (5 एप्रिल) हा नऊ मिनीटांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थीनी मुस्कान खान (Muskan Khan) ही त्याची बहिण आहे, असं सांगितलं. तिचं कौतुक करत अल जवाहिरीनं एक कविता देखील सादर केली. 


ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा संघटनेची धुरा जवाहिरीनं सांभाळायला सुरूवात केली. पण 2020 मध्ये त्याच्या मृत्यूची बातमी जगासमोर आली होती. पण काही महिन्यांनंतर त्यानं एक व्हिडीओ जाहीर करून तो जिवंत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यानं हिजाब प्रकरणाबद्दल एक व्हिडीओ जाहीर केला. SITE इंटेलिजन्स ग्रुपनेही याला दुजोरा दिला आहे. व्हिडीओमध्ये जवाहिरीनं मुस्कान खानचं कौतुक केलं. व्हिडीओमध्ये एक पोस्टर देखील त्यानं जाहीर केलं. त्यामध्ये मुस्कानसाठी Noble woman of india असं लिहिलेलं दिसत आहे. मुस्कानसाठी कविता सादर केल्यानंतर जवाहिरीने हिजाबवर बंदी घालणाऱ्या देशांचा निषेध केला. पाकिस्तान आणि बांगलादेशवरही जवाहिरीने निशाणा साधला. 


कोण आहे मुस्कान खान?
कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना वर्गात बसण्यापासून रोखण्यात आलं होतं. यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी सरकारचा निषेध केला. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता कर्नाटकात हिजाबविरोधात निदर्शनं करणाऱ्यांनी घेरल्यानंतर त्यांना प्रतिकार करणाऱ्या बीबी मुस्कान खान या विद्यार्थिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha