एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबईचा शेख नबी 12 वर्षांपासून पाकिस्तानातच, ISI साठी काम!

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक झालेला भारतीय नागरिक शेख नबी अहमद मुंबईच्या जोगेश्वरचा रहिवासी आहे. पाकिस्तानने रविवारी त्याला अटक केली. पण धक्कादायक म्हणजे 2005 पासून तो पाकिस्तानाच आहे. मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नबी मागील 12 वर्षांपासून पाकिस्तानात आहे, तर आवश्यक कागदपत्रं नसल्याच्या आरोपातून पाकिस्तान सरकार त्याला आताच का अटक केल्याचं दाखवत आहे? असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे. इतकंच नाही तर शेख नबीवे दशकभर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम केलं असून अर्धाडझन भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याचा हात होता. काश्मीरमधून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पोहोचला होता, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. पोलिस अधिकाऱ्यानुसार, 2006 मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता होते. यामध्ये शेख नबीही होता. तो 2005 पासून बेपत्ता होता. ज्या डझनभर लोकांना पकडलं होतं, त्यांना त्यांच्या आई-वडिलांसमोर समज देऊन सोडण्यात आलं. पण महाराष्ट्र पोलिसांच्या विविध तपास यंत्रणा नबीसह मोठा इम्रान आणि छोटा इम्रान या दोन साथीदारांचा शोध घेत होत्या. पाकिस्तानी सीमा ओलांडताना जम्मू काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मोठा इम्रान जखमी झाला होता. त्याआधी तिथल्या पोलिसांनी, नंतर यूपी पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली होती. "दरवर्षी आमचं पथक नबीच्या घराजवळ खबरी पाठवत असे. आमच्या माहितीनुसार, तो मागील 12 वर्षात मुंबईत कधीच आला नाही. पाकिस्तानने त्याच्या ज्या फ्लॅटचा पत्ता दिला, तिथे पाच वर्षांपासून सोळंकी कुटुंब भाड्याने राहत आहे. तपासात समोर आलं की, जोगेश्वरमध्ये रामं मंदिर रोडवर त्याच्या कुटुंबाचं एक घर आहे, पण ते घरही भाड्याने दिलं आहे," असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. शेख नबी आपल्या कुटुंबासह जोगेश्वरीमध्ये एका छोट्या घरात राहत असे. या परिसरात लोक त्याला ताज नावाने ओळखत असत. शेख नबी 12 वर्षांपासून बेपत्ता आहे. स्थानिक पोलिस जवळपास दररोज शेख नबीच्या शोधात त्याच्या घरी येतात. त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या घराचा पत्ताच बदलला आहे. पण नबीचं कुटुंब महाराष्ट्रातच राहतं. शेख नबीवर मुंबई पोलिसात गुन्हेगारी प्रकरणं दाखल आहेत. त्यामुळे पोलिस सातत्याने त्याच्या घरी चौकशीसाठी येतात. 2006 च्या रेल्वे स्फोट आणि औरंगाबाद शस्त्रास्त्र प्रकरणातही पोलिस त्याचा शोध घेत होते. संबंधित बातम्या मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक, पासपोर्ट नसल्याचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget