एक्स्प्लोर

मसूद अजहर जिंदा है : पाकिस्तानी मीडियाचा दावा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर असं वृत्त होतं की, "जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूदची प्रकृती खालावली आहे. त्याला रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे."

इस्लामाबाद : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर जिवंत असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. अजहरच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सूत्रांच्या हवाल्याने मीडियाने हे वृत दिलं आहे. तर पाकिस्तानचं जिओ उर्दू न्यूज या वृत्तवाहिनीने देखील मसूद अजहरची मृत्यूची बातमी खोट असल्याचं म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर असं वृत्त होतं की, "जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूदची प्रकृती खालावली आहे. त्याला रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे." यानंतर सोशल मीडियावर रविवारी मसूदच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यानंतर पाकिस्तानी मीडियाने हे वृत्त फेटाळलं. परंतु सत्य नेमकं काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. पाकिस्तानी वृत्तवाहिनीने मसूदच्या कुटुंबाच्या निकटवर्तीय सूत्रांचा हवाला देत म्हटलं आहे की, "तो अजून जिवंत आहे." मात्र त्याच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनेही मसूज अजहरबाबत मौन बाळगलं आहे. अजहरच्या मृत्यूच्या दावा करणाऱ्या बातम्यांबद्दल विचारलं असता, माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. "मला यावेळी काहीही माहिती नाही," असं त्यांनी सांगितलं. तर दहशतवादी मसूद अजहरच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वृत्ताचा शोध भारतीय गुप्तचर यंत्रणाही घेत आहे. "अजहरवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या किडनी निकामी झाल्या आहेत, याच्याशिवाय आमच्याकडे आणखी माहिती नाही," असं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अजहरचा मृत्यू : सूत्र 40 जवान शहीद आणि एअर स्ट्राईक 14 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायूदलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करुन जैश-ए-मोहम्मदचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. VIDEO : भारताच्या खतरनाक हल्ल्यात मसूद अजहरचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त  कोण आहे मसूद अजहर? मसूद अजहरचा जन्म पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये झाला आहे. त्याचं शिक्षण जामिया उलूम उल इस्लामियात झालं आहे. त्यानंतर हरकत उल अंसारशी जोडल्यानंतर त्याने दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. मसूद 1994 मध्ये श्रीनगरमध्ये आला होता, त्यावेळी भारत सरकारने त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. दहशतवाद्यांनी 1995 मध्ये काश्मीरमधून काही परदेशी पर्यटकांचं अपहरण केलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यातील एक पर्यटक पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्यानंतर दहशतवाद्यांनी सर्व पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर डिसेंबर, 1999 मध्ये दहशतवाद्यांनी काठमांडू एअरपोर्टवरुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे जाणाऱ्या IC814 विमानाचं अपहरण केलं आणि विमान अफगाणिस्तानच्या कंधार येथे घेऊन गेले. विमान अपहरण करून प्रवाशांना वेठीस धरलं आणि मसूद अजहरच्या सुटकेची मागणी सुरु केली. त्यानंतर प्रवाशांच्या जीवाच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद अजहरला भारताच्या तावडीतून सोडवून घेतलं.  VIDEO : ...म्हणून हाफिज, मसूद आणि दाऊदची आता खैर नाही संबंधित बातम्या

भारताच्या हवाई हल्ल्यात 'जैश'चं मोठं नुकसान, मसूदच्या भावाची कबुली, मात्र पाकिस्तानी लष्कराला अमान्य

भारतीय समजून पाकिस्तानी लोकांनी त्यांच्याच पायलटला मारले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget