Israel-Hamas War Live Updates : इस्रायल-हमास युद्धाचा पाचवा दिवस, संघर्ष सुरुच
Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या 7 ऑक्टोबरला युद्धाला सुरुवात झाली असून संघर्ष कायम आहे. आतापर्यंत 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Israel-Hamas War : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षादरम्यान अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड (McDonalds) वर बंदीची मागणी करण्यात येत आहे. मॅकडोनाल्ड्स (Mcd) च्या एका निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Israel-Hamas Conflict : इस्रायलहून भारतीयांची चौथी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये 250 हून अधिक भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे.
इस्रायली आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी 377 अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 99 गंभीर आहेत तर, इतरांची प्रकृती स्थिर आहे. हमाससोबत युद्ध सुरू झाल्यापासून 3,715 जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाने इजिप्तच्या हैफामधून अमेरिकन लोकांना समुद्रमार्गे तात्काळ बाहेर काढण्याची ऑफर दिली आहे. इस्रायलमधील यूएस दूतावासाने अमेरिकन आणि तात्काळ नातेवाईकांना 16 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील हैफा ते सायप्रसला समुद्रमार्गे स्थलांतरित करण्याची ऑफर दिली.
इस्रायलने पाणीपुरवठा बंद केल्यानंतर गाझातील लोकांना आता विहिरींचे दूषित पाणी प्यावे लागत आहे, त्यामुळे पाण्याशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे.
पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी संवाद साध्यल्याची माहिती समोर आली आहे. वाफा वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान, अब्बास यांनी गाझा पट्टीमध्ये तात्काळ मानवतावादी मदतीचा भाग म्हणून मूलभूत साहित्य आणि वैद्यकीय पुरवठा आणि नागरिकांना पाणी, वीज आणि इंधन पुरवठा या संदर्भातील गरजांवर भर दिला. वाफा वृत्तसंस्थेनुसार, गाझा पट्टीतून पॅलेस्टिनींना बाहेर काढण्याचा आदेश अब्बास यांनी स्पष्टपणे नाकारला आहे.
पॅलेस्टिनी वाफा या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ला केला. या बॉम्बहल्ल्यात गेल्या 24 तासांत 400 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले असून 1500 जण जखमी झाले आहेत.
Israel Hamas War : इस्रायलचे (Israel) लष्कर गाझा पट्टीमध्ये घुसले असल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली आहे. बेपत्ता इस्रायलच्या लोकांना शोधण्यासाठी इस्रायली सैनिक गाझा पट्टीमध्ये दाखल झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान बेपत्ता असलेल्यांचा शोध सध्या सौनिकांकडून घेण्यात येत आहे.
Israel-Hamas War Journalist Death : इस्रायल-हमास युद्धात 12 पत्रकारांचा मृत्यू
कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, हमासने गेल्या आठवड्यात इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या हिंसाचारात सुमारे 12 पत्रकार ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत.
Israel-Palestine Confict : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 12000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 'ऑपरेशन अजय' (Operation Ajay) अंतर्गत 197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत पोहोचली आहे. आतापर्यंत इस्रायलहून भारतीयांच्या तीन तुकड्या भारतात पोहोचल्या आहेत. पहिल्या तुकडीत 212 भारतीय, दुसऱ्या तुकडीत 235 भारतीय आणि आता तिसऱ्या तुकडीत 197 भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत.
पार्श्वभूमी
Israel Hamas Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 3000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलला लक्ष्य करत विविध शहरांवर हवाई, समुद्री आणि जमिनीवरून हल्ले करत युद्धाला सुरुवात केली. हमासने इस्रायलवर सुमारे 5000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. इस्रायल लष्कराकडूनही हमासवर प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलकडून गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करुन त्यांचे तळ उदध्वस्त करण्यात येत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -