एक्स्प्लोर

Israel Hamas War : मृत्यूचं तांडव! इस्रायल-हमास युद्धात 4500 हून अधिक मृत्यू, जखमींचा आकडा 12000 पार; 197 भारतीयांची तिसरी तुकडी मायदेशी परतली

Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 'ऑपरेशन अजय' (Operation Ajay) अंतर्गत 197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत पोहोचली.

Israel-Palestine Escalation : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्या घनघोर युद्ध सुरुच आहे. 7 ऑक्टोबरला सुरा झालेल्या युद्धाचा आज नववा दिवस आहे. या युद्धात इस्रायली नागरिक आणि पॅलेस्टिनी यांच्यासह अनेक परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. इस्रायल युद्धातील मृतांचा आकडा 4500 च्या पुढे पोहोचल्याची माहिती आहे. त्याशिवाय या संघर्षात 12 हजार हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध सुरुच

गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहेत.

197 भारतीयांची तिसरी तुकडी दिल्लीत दाखल

युद्धाच्या काळाज भारतासह इतर देशांतील नागरिकही इस्रायलमध्ये अडकले आहेत. इस्रायलमध्ये अडलेल्या भारतीयांची तिसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. यामध्ये तिसऱ्या तुकडीत 197 भारतीय मायदेशी परतले आहेत. याआधी इस्रायलमधून भारतीयांच्या दोन तुकड्या सुखरुप भारतात परतल्या आहेत. शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी 235 भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत पोहोचली. त्याआधी 212 भारतीय इस्रायलमधून सुखरुप भारतात परतले आहेत. 

इस्रायल गाझा पट्टीत 10 हजार सैनिक पाठवणार

गाझा शहराचा ताबा घेण्यासाठी आणि गाझा पट्टी नष्ट करण्यासाठी इस्रायलने 10,000 सैन्य पाठवण्याची योजना आखली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, 2006 च्या दुसऱ्या लेबनॉन युद्धानंतर हे सर्वात मोठं युद्ध असेल आणि इस्रायल लष्कर (IDF) तात्पुरता गाझाचा काही भाग काबीज करण्याचा प्रयत्न करेल.

इस्रायल-हमास युद्धात 12 पत्रकारांचा मृत्यू

इस्रायल-हमास युद्धात पत्रकारांचाही मृत्यू झाला असून काही पत्रकार जखमी झाले आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या हिंसाचारात सुमारे 12 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Israel-Hamas War : मृत्यूच्या दाढेतून परतली! गाझामधील सुटकेनंतर भारतात परतलेल्या महिलेनं सांगितलं युद्दाचं धक्कादायक वास्तव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Policy Protest: हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
PM Kisan : पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?
पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Mumbai Local : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकलचे सर्व डबे एसी असणार,  तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता
उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Narvekar on Awhad vs Padalkar : आव्हाड-पडळकर राडा, अध्यक्षांनी निर्णय दिला, कोण दोषी?
Gopichand Padalkar : शांततेचा अर्थ वेगळा घेऊ नका,गोपीचंद पडळकर थेट बोलले
Jitendra Awhad : विधानभवनात हाणामारी, मध्यरात्री राडा ते गुन्हा; आव्हाडांनी सगळं सांगितलं
Jitendra Awhad FIR : विधान भवनाबाहेर मध्यरात्रीचा थरार; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
Maharashtra Assembly Brawl | विधानसभेत गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Policy Protest: हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
हुकूमशहा शांतपणे मरत नाहीत! अमेरिकन जनता पुन्हा ट्रम्पविरोधात रस्त्यावर; हुकूमशहा म्हणत तब्बल 1600 ठिकाणी आंदोलन
PM Kisan : पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?
पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Mumbai Local : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लोकलचे सर्व डबे एसी असणार,  तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लोकलचे सर्व डबे एसी असणार, तिकीट दरात रुपयाही वाढणार नाही, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता
उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय; 3 वर्षे शिव्या-शाप म्हणत एकनाथ शिंदेंनी भडास काढली, हिशेब चुकता
ED Raid Update: लेकाला ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, मोदी-शाहांनी त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी ईडी पाठवली
लेकाला ईडीकडून अटक; माजी मुख्यमंत्री म्हणाले, मोदी-शाहांनी त्यांच्या मालकाला खूश करण्यासाठी ईडी पाठवली
मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्राचं वाटप; विभाग उपायुक्ताचं थेट विधानसभेतून निलंबन, मंत्री महोदयांची घोषणा
मराठा तरुणांना आदिवासी प्रमाणपत्राचं वाटप; विभाग उपायुक्ताचं थेट विधानसभेतून निलंबन, मंत्री महोदयांची घोषणा
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांची आव्हाडांना वॉर्निंग, म्हणाले, 'मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका'
गोपीचंद पडळकरांची आव्हाडांना वॉर्निंग, म्हणाले, 'मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका'
RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई, विविध कारणांसाठी आर्थिक दंड ठोठावला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई, विविध कारणांसाठी आर्थिक दंड भरावा लागणार
Embed widget