एक्स्प्लोर

Israel-Hamas War : '16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील नियंत्रण संपलं', इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

IDF Gaza Attack : पॅलेस्टिनी नागरिकांना आता हमासवर विश्वास नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे.

Israel Palestine Connflict : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या वणव्याची धग कायम आहे. या संघर्षाला एक महिना उलटून गेला असला, तरी हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझा पट्टीचून हमासचं नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत हल्ले सुरुच आहेत. आता इस्रायल लष्कर हवाई मार्गासह गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहे. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नागरिकांचा आता हमासवर विश्वास राहिलेला नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे. गाझातील नागरिक आता हमासचे तळ लुटत आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरुच

गाझा पट्टीमध्ये इस्रायल लष्कराने केलेल्या हल्ल्यात 11,240 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4630 मुलांचा समावेश आहे. गाझावरील हल्ल्यानंतर अनेक दिवसांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी दावा केला आहे की, हमासचे गाझावरील नियंत्रण सुटलं आहे. 16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील प्रभुत्व संपुष्टात आलं आहे. आता पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हमासवर विश्वास नाही. गाझामधील नागरिक हमासचे तळ लुटत आहेत.

'16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील नियंत्रण संपलं'

एएफपीच्या वृत्तानुसार, इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दावा केला आहे की, "हमासचा गाझावर 16 वर्षांपासून ताबा होता. पण, हमासने आता गाझा पट्टीवरील नियंत्रण गमावलं आहे. त्यामुळे हमासचे दहशतवादी पळ काढत आहेत. हमासचे दहशतवादी दक्षिणेकडे पळून जात आहेत. हमासचे तळ नागरिकांनी उद्ध्वस्त केलं आहेत. नागरिक हमासच्या तळांना लक्ष्य करत लूटमार करत आहेत. गाझातील नागरिकांचा सरकारवर विश्वास नाही."

अल-शिफा हॉस्पिटलमधून वाईट बातमी

गाझाचे सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा काही दिवसांपासून युद्धाचं केंद्र बनलं आहे. इस्रायलने या हॉस्पिटलवर हल्ला केल्याचा आरोप हमासने केला आहे. पण इस्रायली लष्कराने रुग्णालयाच्या आसपास हमासच्या दहशतवाद्यांवर लक्ष्य करत असल्याचा दावा केला आहे. अल-शिफा या गाझाचे सर्वात मोठे रुग्णालयामध्ये हमास कमांड सेंटर चालवत असल्याचा दावा इस्रायल लष्कराने केला आहे.

गाझामध्ये दररोज 4 तासांची शस्त्रसंधी

दरम्यान, इस्रायलने म्हटले आहे की, उत्तर गाझामधील त्यांच्या ग्राउंड ऑपरेशन्सवर दररोज चार तासांचा युद्धविराम लागू करण्यात येईल, यामुळे येथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर जाण्याची संधी मिळेल. या युद्धामुळे जगभरात इस्रायलविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. युद्ध थांबवण्यासाठी त्याच्यावर सतत दबाव टाकला जात आहे. पण, पॅलेस्टिनी संघटना हमासचा अंत केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नसल्याचं इस्रायलने आधीच स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Israel Gaza Attack : युद्धभूमी गाझा बनली निष्पाप चिमुकल्यांची स्मशानभूमी, प्रत्येक दहाव्या मिनिटाला एका बालकाचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Embed widget