International Friendship Day 2022 : मैत्री हे असं निखळ नातं आहे ज्याला कोणत्याच पुराव्याची गरज लागत नाही. मित्र-मैत्रिणी असे असतात ज्यांच्याबरोबर आपण सुख-दु:ख वाटू शकतो. काहीही गोष्टी शेअर करू शकतो. याच मैत्रीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे जागतिक मैत्री दिन (International Friendship Day)  . जागतिक मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. याच निमित्ताने जाणून घेऊयात जागतिक मैत्री दिनाचा इतिहास. 


जागतिक मैत्री दिनाचा इतिहास (International Friendship Day History 2022) :   


आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही 1958 साली झाली. जॉय हॉल या नावाच्या व्यक्तीचा हॉलमार्क कार्ड्सचा व्यवसाय होता. लोकांनी फ्रेंडशिप डे साजरा करुन आपल्या मैत्रीच्या नात्याला अधिक घट्ट करावं अशी त्याची इच्छा होती. त्यातूनच त्याने फ्रेंडशिप डे साजरा करायला सुरवात केली. असे सांगण्यात येते. युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. 


मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान आणि बरंच काही. मैत्री हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट असते. मैत्रीचे नात्यात जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रकारचे अडथळे कधीही येत नाहीत. भारतात मैत्रीच्या नात्याला एक खास असं स्थान आहे. म्हणूनच मैत्रीच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटं आणि हिट गाणी तयार झालेली आहेत. 


जागतिक स्तरावर आज  फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. मात्र, भारतात हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. मैत्रीचा दिवस हा कधीही साजरा केला जात असला तरी मात्र, आपल्या मित्र-मैत्रीणींवरील मैत्रीची साक्ष देणारा हा दिवस प्रत्येकासाठी खासच असतो. 


महत्वाच्या बातम्या :