Nag Panchami 2022 : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर आहे. श्रावण महिन्यात सोमवारला अतिशय महत्त्व आहे. परंतु, सोमवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी (Nag Panchami 2022). यंदा नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. यंदाच्या नागपंचमीचा शुभ मुहूर्त काय आहे? नागाची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी जाणून घ्या. 


नागपंचमी 2022 शुभ मुहूर्त : नागपंचमीची पंचमी तिथी ही 2 ऑगस्ट रोजी पहाटे 05:13 वाजेपासून सुरू होणार आहे. नागपंचमी तिथी समाप्ती 3 ऑगस्ट रोजी सकाळी 05:41 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. सकाळी 06:05 वाजेपासून ते सकाळी 08:41 वाजेपर्यंत नाग पंचमीच्या पूजेची मुहूर्त आहे. या वर्षी नागपंचमीला दोन विशेष योगही तयार होत आहेत. 2 ऑगस्टला शिव आणि सिद्धी योगात नागपंचमी साजरी होणार आहे. या योगांमध्ये नागांची पूजा केल्याने दुहेरी फळ मिळते.


नागपंचमीला नागदेवतेची पूजा कशी करावी?


नागपंचमीच्या दिवशी काल सर्प दोष पूजेसोबत राहू दोषाचीही पूजा करता येते. पंचमीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे. नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात. त्यानंतर नागदेवतेला आवाहन करावे. त्यांना हळद, लाह्या, तांदूळ घालून तिलक लावावा. फुले अर्पण करावी. उदबत्ती करावी. कच्च्या दुधात साखर मिसळून नागदेवतेला पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची आरती करावी. 


नागपंचमीचे महत्त्व : 


नागपंचमीच्या दिवशी अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट, शंख, कालिया आणि पिंगल या देवतांची पूजा केली जाते. जे लोक या दिवशी भगवान शंकराची, नागाची पूजा करतात आणि रुद्राभिषेक करतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे संपतात. तसेच जर कुंडलीत राहु आणि केतू पासून काही दोष असेल तर या दिवशी नागांची पूजा केल्याने राहु आणि केतू ग्रहांचे अशुभ परिणाम देखील दूर होतात.


महत्वाच्या बातम्या :