Shravan 2022 : हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण (Shravan 2022) महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. पवित्र अशा श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या महिन्यात विविध व्रतवैकल्य केली जातात. पूजा पाठ केले जातात. एकंदरीतच आनंदाचा आणि उत्साहाचा हा श्रावण महिना असतो. याच श्रावण महिन्याची सुरुवात नेमकी कधीपासून होतेय? तसेच या महिन्यात कोणत्या दिवशी कोणते सणवार आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्याठीच आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला श्रावणातील महत्वाच्या दिवसांची यादी देणार आहोत.


पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात यावर्षी 29 जुलैपासून होतेय. श्रावण जवळ येत असल्यामुळे पूजेचे साहित्य खरेदीसाठी, तसेच सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी भाविकांची लगबग सुरु झाली आहे. 


श्रावण महिन्यातील सणवारांची यादी : 


1 ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार


2 ऑगस्ट : नागपंचमी


5 ऑगस्ट : दुर्गाष्टमी 


8 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार शिवामूठ (तीळ)


9 ऑगस्ट : मंगळागौर 


11 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन 


15 ऑगस्ट  : तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ मूग), संकष्टी चतुर्थी चंद्रोदय 09:44, पतेती, स्वातंत्र्य दिन 


16 ऑगस्ट : मंगळागौरी, पारशी नववर्ष 


19 ऑगस्ट : गोपाळकाला, श्रावण सोमवार (शिवामूठ जव)


26 ऑगस्ट :  पोळा (श्रावण अमावस्या) दश अमावस्या


28 ऑगस्ट :  भाद्रपद महिना सुरु


श्रावणाचे महत्त्व : 


हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. या महिन्यात विविध सण, उत्सव साजरे होत असल्या कारणाने एकंदरीतच आनंदित वातावरण पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे श्रावणात निसर्ग देखील बहरून निघतो त्यामुळे श्रावणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.  


महत्वाच्या बातम्या :