ATM Machine Gift : अनेकदा आपण आपल्या प्रिय व्यक्तींसाठी विविध भेटवस्तू देतो. जगात अशी एकापेक्षा एक उदाहरणे आहेत जी आपल्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. पण काही लोक आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी अशा काही विचित्र गोष्टी करतात. जे चर्चेचा विषय बनतात. पत्नीला पैशांची कमतरता भासू नये  म्हणून पत्नीच्या वाढदिवशी पतीने तिला चक्क ATM मशिनच गिफ्ट म्हणून दिले आहे. 



जोडीदाराला एटीएम मशीन भेट


आजच्या काळात जिथे बहुतांश लोक कॅशलेस पेमेंटकडे वळत आहेत, तिथे या व्यक्तीने भेट म्हणून चक्क एटीएमएम दिले. पत्नीला पैशांची कमतरता भासू नये, अशी पतीची धारणा होती. इंडोनेशियामध्ये राहणारे रफी ​​अहमद यांनी त्यांची पत्नी नगीता स्लाविना यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एटीएम मशीन भेट दिली. हे दोघेही सेलिब्रिटी आहेत. या अनोख्या भेटीचा एक व्हिडिओही रफीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही अनोखी भेट पाहून लोक थक्क झाले. ही भेट त्याच्यासाठी आणली आहे. यावर त्याच्या पत्नीचाही विश्वास बसत नव्हता. एटीएममधून पैसे काढल्यावर पत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही.



पत्नीला आश्चर्याचा धक्का
एटीएममधून प्रत्यक्षात पैसे बाहेर पडल्याचे पाहून पत्नीला धक्काच बसला. त्याचवेळी हे बघून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोकांनी प्रश्न विचारला की हे कसे होऊ शकते? यावर बँक नेग्रा इंडोनेशियाचे म्हणणे आहे की, हे एटीएमएम पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यांनी सांगितले की, रफी हे त्यांच्या बँकेचे सर्वात महत्त्वाचे ग्राहक आहेत. अशा परिस्थितीत बँकेने त्यांच्यासाठी वैयक्तिक एटीएम देण्यात वेळ घालवला नाही. हे एटीएम मशीन दाम्पत्याच्या कंपनीजवळ बसवण्यात येणार आहे. जिथे इतर लोकही पैसे काढू शकतात. वाढदिवसानंतर ते चांगल्या ठिकाणी ठेवण्यात येईल.


महत्त्वाच्या बातम्या:


    Ukraine-Russia War : PM मोदींची उच्चस्तरीय बैठक, काही मंत्री युक्रेनला जाण्याची शक्यता


Russia Ukraine War : 'G7 देश युक्रेनला युद्धासाठी शस्त्रे आणि पैसा पुरवतील', युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा