Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर रशियाचा शेअर बाजार आणि रुबल (रशियाचे चलन) घसरल्याने रशियाच्या अब्जाधीशांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी क्रेमलिन येथे झालेल्या बैठकीत देशातील सर्वोच्च व्यावसायिकांना सांगितले की, जे घडत आहे तो आवश्यक उपाय आहे.


पुतिन यांनी बोलावलेल्या बैठकीला सुमारे 13 अब्जाधीश उपस्थित होते. पुतिन व्यावसायिकांशी बोलताना म्हणाले की, 'जे घडत आहे तो आवश्यक उपाय आहे. आमच्यासाठी याशिवाय कोणतीही संधी उरली नाही.' मिळालेल्या वृत्तानुसार, अब्जाधीशांपैकी कोणीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली नाही.


वृत्तानुसार समोर आले आहे की, गुरुवारी क्रेमलिनमधील अब्जाधीशांपैकी पाच अब्जाधीश - अलेकपेरोव्ह, मिखेल्सन, मोर्दशोव्ह, पोटॅनिन आणि केरिमोव्ह यांनी दिवसभरात सर्वाधिक डॉलर गमावले. दरम्यान, 11 रशियन अब्जाधीशांनी गुरुवारी प्रत्येकी एक अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक गमावले.


गुरुवारी रशियाचा Moex निर्देशांक 33 टक्क्यांनी खाली आल्यानंतर आणि डॉलरच्या तुलनेत रूबल विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्यानंतर अंदाजे 71 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha