एक्स्प्लोर
भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या
भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तज्ज्ञ तुषार अत्रे यांची अमेरिकेत हत्या, तुषार हे यशस्वी आणि कोट्यधीश उद्योजक, पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत आढळला मृतदेह.
कॅलिफोर्निया (अमेरिका) : भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तज्ज्ञ तुषार अत्रे यांची अमेरिकेतून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.
कॅलिफोर्नियातील त्यांच्या राहत्या घरातून अत्रे यांचे अपहरण करण्यात आले होते, मंगळवारी (१ आक्टोंबर) सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून पळवून नेण्यात आले.
पोलिसांच्या तपासात अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळला. या प्रकरणात अनेक संशयित असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तुषार अत्रे यांच्या हत्येमध्ये कोणाचा हात असल्याचे अजूनही निश्चित झाले नसून दरोड्याच्या हेतूने अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे.
५० वर्षीय तुषार यांची सिलीकॉन व्हॅलीमध्ये कंपनी होती. तुषार हे यशस्वी आणि कोट्यधीश उद्योजक होते. अपहरणाअगोदर अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement