एक्स्प्लोर
बाणकोटच्या तरुणाची सौदीत गोळ्या झाडून हत्या

रत्नागिरी: रत्नागिरीच्या बाणकोटमधील एका तरुणाची सौदी अरेबियात हत्या करण्यात आली आहे. म्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव आहे. ४ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली.
म्हसब परकार हा चार वर्षांपासून सौदी अरेबियातील अल-खोबरमधील एका शेख कुटुंबाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही कारणांवरून मालक आणि म्हसबमध्ये वाद निर्माण झाला. या वादानंतर मालकाच्या मुलाने म्हसबवर तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्यातच म्हसबचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
म्हसबचा भाऊ मझर परकार हा नोकरीनिमित्त दुबईत असतो.
दरम्यान, म्हसबचं मे महिन्यात लग्न ठरवण्यात आलं होतं. मात्र आता म्हसबची सौदीत हत्या झाल्याने बाणकोट परिसरात शोककळा पसरली आहे. म्हसबचे वडील आबा परकार आणिआई निशाद परकार बाणकोट इथं राहतात.
भारतीय दूतावासने या घटनेची दखल घेतली असून, सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून म्हसबचा मृतदेह दोन दिवसात बाणकोटला आणला जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
