एक्स्प्लोर

मोठी बातमी! 5 लाख स्थलांतरितांना मिळणार अमेरिकेचं नागरिकत्व; बायडन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

American Green Card News: अमेरिकन सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्ड आणि यूएस नागरिकत्व मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणं हाच आहे.

Indian American Green Card: नवी दिल्ली : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) लवकरच मोठी घोषणा करणार आहेत. बायडन यांच्या घोषणेचा मोठा फायदा अमेरिकेत (America News) राहणाऱ्या भारतीयांना होणार आहे. पण कसा? तर, कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या पार्टनर्सना याचा फायदा मिळणार आहे. ज्यांच्या पार्टनर्सकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे, त्यांनाही आता अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं सोपं मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांसाठी अमेरिकन सरकारकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे स्थलांतरित, पण ज्यांनी अमेरिकन नागरिकांशी आपली लग्नगाठ बांधली आहे, अशा नागरिकांना वर्किंग परमिट आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणं फारच सोपं होणार आहे. एनबीसी न्यूजनुसार, 'पॅरोल इन प्लेस' नावाच्या या कार्यक्रमाचा फायदा तब्बल पाच लाख स्थलांतरितांना होणार आहे, जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत आहेत. यामुळे या नागरिकांचा डिपोर्टेशनपासून बचाव होणार आहे. 

अमेरिकन सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्ड आणि यूएस नागरिकत्व मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणं हाच आहे. एनबीसी न्यूजनुसार, कागदपत्रं नसलेल्या जोडीदारांना प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर वर्क परमिट मिळवण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत. 

उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर किमान 10 वर्ष अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांनाच नागरिकत्व दिलं जाईल. यासह, अशा स्थलांतरित मुलांना ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्व देखील मिळू शकेल, ज्यांच्या आई किंवा वडिलांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं आहे, त्यांना ग्रीन कार्ड दिलं जाणार आहे. 

सध्या अमेरिकन नागरिकाशी लग्न करूनही कोणी कागदपत्रांशिवाय एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ अमेरिकेत राहिल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. अशा व्यक्तीला 10 वर्षांसाठी अमेरिकेत प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा लाभ फक्त त्या स्थलांतरितांनाच मिळेल ज्यांचा कार्यकाळ 17 जूनपर्यंत 10 वर्षांचा झाला असेल. एनबीसी न्यूजनुसार, बायडन सरकारच्या या उपक्रमाचा एक उद्देश असा आहे की, जे विद्यार्थी म्हणून अमेरिकेत येतात आणि नंतर अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर येथे स्थायिक होतात त्यांना मदत करणं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमीZero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय?Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रAaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
Embed widget