CDS Bipin Rawat Death : जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात असताना कपटी चीननं मात्र गरळ ओकली आहे. या अपघातात भारतीय सैन्यातील अनेक त्रुटी असल्याचा कांगावा करत जनरल रावत चीनविरोधी होते असंही चीननं म्हटलं आहे. चीन कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र ग्लोबल टाईम्समधून चीननं या दुःखद समयीदेखील भारतविरोधी रंग दाखवले आहेत. शिवाय हा अपघात म्हणजे भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाला मोठा धक्का असल्याचंही या वृत्तात म्हटलंय. चीन नैतिकताही विसरला, अशा शब्दांत भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी चीनवर पलटवार केला आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये म्हटलं आहे की, या अपघातासाठी भारतीय सैन्यातील त्रुटी जबाबदार आहेत. दरम्यान यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. चीन नैतिकताही विसरला, असल्याची प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करप्रमुख वेद मलिक यांनी म्हटलं आहे. तर निवृत्त जनरल व्ही. पी. मलिक यांनी म्हटलं आहे की, सामाजिक नैतिकता आणि मूल्यांची चीनकडे खूप कमी आहे. अशात आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करु शकतो. CDS बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर चीनी मुखपत्राद्वारा असंवेदनशील आणि अनुचित टिपण्णी करण्यात आली आहे. चीनचा इतिहासच मानवाधिकारांचं हनन आणि युद्ध अपराधाचा आहे, अशा शब्दात निवृत्त जनरल व्ही. पी. मलिक यांनी संताप व्यक्त केला आहे.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार
तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं गेलं. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
काल तामिळनाडूतून 13 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालमपूरमध्ये आणण्यात आलं. यावेळी निधन झालेल्या 13 जणांचं कुटुंब उपस्थित होते. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली. शिवाय तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
CDS General Bipin Rawat यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली : Rajnath Singh
इतर महत्त्वाच्या बातम्या :