बंगळुरु/नवी दिल्ली : हवाईदलाचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाने संरक्षण दलाचा प्रमुख गमावला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat death) यांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका (Madhulika Rawat) आणि हेलिकॉप्टरमधील 13 जणांनी प्राण गमावले. यामध्ये भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेबाबत देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर बिपीन रावत यांच्या निधनावर दु:ख आणि खेद व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी रावत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्यासोबत इतर लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बिपिन रावत यांचं पार्थिव उद्या संध्याकाळी दिल्लीत आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.


कोण काय म्हणाले?


राष्टपती रामनाथ कोविंद -






पंतप्रधान नरेंद्र मोदी - 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले की, बिपीन रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही. सच्चा देशभक्ताला सलाम!   




Gen Bipin Rawat was an outstanding soldier. A true patriot, he greatly contributed to modernising our armed forces and security apparatus. His insights and perspectives on strategic matters were exceptional. His passing away has saddened me deeply. Om Shanti. pic.twitter.com/YOuQvFT7Et


— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021






गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले- 


रावत यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत असून गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तुमचं शौर्य देश विसरणार नाही, असं शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय.










राजनाथ सिंह - 


राजनाथ सिंह यांनी रावत यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. रावत यांचं शौर्य देश कधीच विसरणार नाही. रावत यांच्या निधनामुळे लष्कराचं मोठं नुकसान झालं आहे.






राहुल गांधी -






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र शोक
भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.  दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. 


अनिल देसाई, खासदार, शिवसेना


 ही खूप दु:खद घटना आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह अनेकांचे निधन झालंय.या घटनेची चौकशी संरक्षण विभाग करत आहेच.परंतु पंतप्रधान,राष्ट्रपतीसह अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती अशा हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. त्यामुळं हे गंभीर आहे.


भाजप अध्यक्ष जेपी नड्डा -






विजय गोयल -






सुरेश प्रभु -






कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत?
2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती. बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते. रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले. रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.


IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर -
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.