एक्स्प्लोर

बिघडत चाललेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफमधील राजदूतांना परत आणण्याचा भारताचा निर्णय

अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये भारताने मजार-ए-शरीफमध्ये काम करणाऱ्या आपल्या मुत्सद्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अधिकाऱ्यांना आणण्यासाठी एक विशेष विमान पाठवले आहे.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता भारताने कंधार नंतर मजार-ए-शरीफमधील आपले वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने आपले मुत्सद्दी, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अधिकारी बुधवारी सकाळपर्यंत भारतात पोहोचतील.

यासाठी एक विशेष विमान काबूलला पोहोचले असल्याची माहिती सरकारच्या उच्च सूत्रांनी दिली आहे. हे विमान मजार-ए-शरीफला उतरेल आणि भारतीय अधिकाऱ्यांसोबत आज संध्याकाळपर्यंत उड्डाण करू शकते. भारत सरकारने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफमधील सुरक्षा व्यवस्था बिघडत चालली आहे.

काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तान-तालिबानवर विशेष चर्चा करण्याची मागणी होती. त्यानंतर या महत्त्वाच्या विषयावर तिथे चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान भारताने स्पष्टपणे सांगितले होते की शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबानने दहशतवादाचा मार्ग सोडून द्यावा आणि त्याचवेळी अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत. भारताकडून सुरक्षा परिषदेत या चर्चेबद्दल असेही म्हटले गेले की तालिबान चर्चेच्या प्रक्रियेत दबाव वाढवण्यासाठी हिंसेचा मार्ग वापरू शकत नाही.

सध्या अफगाणिस्तानमध्ये लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तालिबान शक्य तितक्या लवकर काबूल शहर पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे, तर लष्कर या दहशतवाद्यांना शहराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर काबीज केलं 

तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहर ताब्यात घेतले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा देशात आपले पाय पसरत आहे आणि त्याने अनेक क्षेत्रांवर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा हिंसाचार सुरूच आहे.

यापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी तालिबान्यांनी हल्ला करून अफगाण सरकारच्या राज्य मीडिया केंद्राच्या संचालकाची हत्या केली. अलीकडच्या काळात सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येची ही ताजी घटना आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वीच देशाचे काळजीवाहू संरक्षण मंत्री यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget