एक्स्प्लोर

ट्रम्प म्हणाले, 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात आणि...' आता भारतानं काय म्हटलं? त्याच भाषेत उत्तर दिलं की नाही?

Donald Trump on India: भारताची तुलना थेट नरकाशी केल्यानंतर भारतामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. सोशल मीडियातही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Donald Trump on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला 'नरककुंड' संबोधणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि रेडिओ होस्ट मायकल सॅव्हेज यांनी लिहिलेल्या या पत्रात जन्मसिद्ध नागरिकत्वावर टीका करण्यात आली आहे आणि भारत व चीनसह अनेक देशांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, स्थलांतरित लोक त्यांच्या मुलांना जन्मसिद्ध हक्काने नागरिकत्व मिळवून देतात आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित होते. त्यात जन्मसिद्ध हक्क कायद्यावर (Birthright Act) टीका करण्यात आली असून, हा निर्णय न्यायालये किंवा वकिलांनी नव्हे, तर देशव्यापी मतदानाने घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. सॅव्हेज यांचा व्हिडिओ या पत्रासोबत टॅग केला आहे.

आम्ही यासंबंधी काही अहवाल पाहिले आहेत

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची तुलना थेट नरकाशी केल्यानंतर भारतामध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. सोशल मीडियातही संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने  प्रतिक्रिया दिली आहे. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले, "सध्या मी एवढेच सांगेन की, आम्ही यासंबंधी काही अहवाल पाहिले आहेत." दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूरवरूनही सातत्याने डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात बोलले आहेत. टॅरिफवरूनही त्यांनी सातत्याने भारताला लक्ष्य केलं आहे.  

ट्रम्प यांनी 22 दिवस जुन्या व्हिडिओचा मजकूर शेअर केला

हा व्हिडिओ मायकल सॅव्हेज यांनी 1 एप्रिल रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपित (live-stream) केला होता. ट्रम्प यांनी चार पानी निवेदन 'ट्रुथ सोशल'वर शेअर केले. त्यात सॅव्हेज म्हणतात, "(अमेरिकन) संविधान हे लोक विमानाने प्रवास करू लागण्यापूर्वीच लिहिले गेले होते. अर्थातच, टेलिव्हिजन, इंटरनेट, रेडिओ आणि आकाशवाणीच्याही आधी." संविधानातील अनेक युक्तिवाद आता समर्पक राहिलेले नाहीत. आता, काही लोक गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत येतात आणि बाळाला जन्म देतात, ज्यामुळे त्या मुलाला तात्काळ नागरिकत्व मिळते. मग, त्या आधारावर, ते त्यांच्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांनाही अमेरिकेत आणतात. अशा घटना आता सामान्य झाल्या आहेत, आणि परिणामी, अमेरिकेची भाषा आणि ओळख बदलत आहे. स्थलांतरितांमध्ये आता देशाबद्दल पूर्वीसारखी आपुलकीची भावना दिसून येत नाही.

कॅलिफोर्नियामध्ये भारतीय आणि चिनी लोकांचे वर्चस्व

या पत्रात कॅलिफोर्नियाच्या तंत्रज्ञान क्षेत्राचाही उल्लेख आहे, ज्यात म्हटले आहे की या क्षेत्राशी संबंधित नोकऱ्यांमध्ये भारतीय आणि चिनी लोकांचा लक्षणीय प्रभाव आहे. तेथील कंपन्यांमधील भरतीचे वातावरण इतके गुंतागुंतीचे झाले आहे की इतरांसाठी संधी मर्यादित आहेत. या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी, तुमच्या पात्रतेपेक्षा तुमचा मूळ देश अधिक महत्त्वाचा ठरतो आणि त्यानुसारच ही व्यवस्था काम करते, ज्यात भारतीय आणि चिनी लोकांना प्राधान्य दिले जाते. याचा अर्थ असा की, भरती प्रक्रिया निष्पक्ष नसून विशिष्ट गटांच्या बाजूने पक्षपाती आहे.

स्थलांतरितांसाठी काम करणाऱ्या संस्थेबद्दल नाराजी

हे पत्र लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या 'अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन' या संस्थेलाही लक्ष्य केलं आहे. त्यात म्हटले आहे की, ही संस्था बेकायदेशीर स्थलांतरितांना फायदा पोहोचवणाऱ्या धोरणांना पाठिंबा देते. या संस्थेवर कठोर कायद्यांनुसार खटला चालवला पाहिजे. त्यात असाही आरोप आहे की, स्थलांतरित आरोग्यसेवा आणि इतर सरकारी सुविधांचा अतिवापर करतात, ज्यामुळे करदात्यांवर आर्थिक भार पडतो. कल्याणकारी योजनांमधील फसवणूक आणि स्थलांतराचा सांस्कृतिक व भाषिक ओळखीवर होणारा परिणाम यांचाही उल्लेख आहे. त्यात असा आरोप आहे की, स्थलांतरित आता रुग्णालयांमध्ये अधिक उपचार घेतात आणि व्यवस्थेचा गैरफायदा घेत आहेत. किरकोळ आजारांसाठीही मोठा खर्च होत असल्याचे ते सांगतात.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget