(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple : भारतीय कर्मचाऱ्यानं अॅपल कंपनीला 140 कोटींना फसवलं, 20 वर्षांची होऊ शकते शिक्षा
Apple Latest News : अॅपल कंपनीला एका माजी कर्मचाऱ्यानं 20 मिलियन डॉलरचा (140 कोटी) चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apple Latest News : अॅपल कंपनीला एका माजी कर्मचाऱ्यानं 20 मिलियन डॉलरचा (140 कोटी) चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. अॅपल कंपनीला कोट्यवधी रुपयांचा धोखा दिल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या धीरेंद्र प्रसाद याला दोषी ठरवण्यात आले आहे. याप्रकरणी धीरेंद्र याला वीस वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. धीरेंद्र यानं अॅपल कंपनीसोबत जवळपास दहा वर्ष काम केलं आहे. धीरेंद्र यानं 2018 पर्यंत कंपनीला 140 कोटींचा चुना लावल्याचा आरोप लावला आहे.
भारतीय वंशाचे धीरेंद्र प्रसाद दहा वर्षांपासून ॲपल कंपनीमध्ये ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. धीरेंद्रने आपला गुन्हा कबूल केला असून वीस वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. धीरेंद्र यानं कॅलिफोर्निया येथील अॅपल कंपनीला 140 कोटी रुपयांचा चूना लावला आहे. याप्रकरणी धीरेंद्रला वीस वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. प्रसादने वेगवेगळ्या आयडियाचा वापर करत कंपनीला चुना लावला आहे. भ्रष्टाचार करणे, चलन वाढवणे, ॲपलला कधीही न मिळालेल्या सर्व्हिससाठी पैसे घेणे यासारखी अनेक कामं करत धीरेंद्रने पैसे जमा केले होते.
एका लिखित याचिकेत 52 वर्षीय प्रसादने गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्याने 2008 ते 2018 या कालावधीत अॅपल कंपनीसोबत ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम केलेय. 2011 पासून धीरेंद्र यानं कंपनीमध्ये घोटाळा करायला सुरुवात केली होती. मदरबोर्डच्या कंपोनेंटपासून हार्वेस्ट करत असत. त्याशिवाय बेकर या कंपोनेंट्सला परत कंपनीला पाठवायचे. त्यासाठी CTrends हे इनव्हॉइस तो फाईल करत होता. या घोटाळ्यातून मिळालेली रक्कम धीरेंद्र प्रसाद वाटप करत होते. 2011 ते 2018 या कालावधीत धीरेंद्र यानं कंपनीची फसवणूक केल्याची कबुली दिली. यामुळे अॅपल कंपनीला 17 मिलियन डॉलर म्हणजेच 140 कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे.
धीरेंद्र प्रसाद यांचा निर्णय कोर्टानं मार्चपर्यंत राखून ठेवला आहे. मार्चमध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे स्थानिक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. धीरेंद्र याला मेल फसवणूक आणि वायर फसवणूक करण्याच्या कटामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकन सरकारनं धीरेंद्र प्रसाद याची पाच मिलियन डॉलरपेक्षा अधिक संपती जप्त केली आहे. प्रसाद याच्या प्रकरणाची 14 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणामध्ये धीरेंद्र प्रसाद याला वीस ते पंचवीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.